Brain Power Tips : मेंदूचे आरोग्य वाढवण्यासाठी ‘या’ 4 गोष्टी कायम लक्षात ठेवा, जाणून घ्या

माणसाचा मेंदू सतत काम करत असतो. मेंदू कधीही आराम करत नाही, परंतु काम करण्यासाठी मेंदू स्थिर असणे आवश्यक असते. मेंदू निरोगी ठेवून व्यक्ती आपल्या जीवनात अनेक प्रकारे सुधारणा करू शकतो. धावपळीच्या जीवनात कमी वेळात जास्त काम करण्यासाठी मेंदूने योग्यवेळी योग्य प्रतिक्रीया देणे गरजेचे आहे. अशावेळी मेंदूची शक्ती वाढवण्यासाठी काही पद्धती वापरणे गरजेचे आहे. आम्ही तुम्हाला अशा 4 पद्धती सांगणार आहोत, ज्या रोज शास्त्रीय पद्धतीने करण्याची गरज आहे.

व्यायाम
व्यायाम करताना शरीर हालत असल्याने त्याचा फायदा मेंदूला सुद्धा होता. पोहणे, चालणे, जॉगिंग, डान्सिंगमुळे आरोग्यच नव्हे तर मेंदूची कार्यप्रणाली सुद्धा गतिशील होण्यास मदत होते. बोस्टन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनुसार शारीरीक व्यायाम आरोग्य, स्मरणशक्तीसह मेंदूला योग्य पद्धतीेने काम करण्यास योग्य बनवतो. हा शोध 18 ते 31 वर्षांचे तरूण आणि 55 ते 74 वर्षांच्या ज्येष्ठांवर करण्यात आला.

चहा पिणे
नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापुरच्या अभ्यासानुसार जास्त कॉफी पिणे अल्जायमर रोग दूर करण्यासाठी चांगले ठरू शकते, परंतु चहा पिणार्‍या लोकांसाठी चांगली बातमी आहे की, चहा पिणे मेंदूसाठी सुद्धा चांगले आहे. नियमित चहा पिणार्‍या 60 पेक्षा जास्त वय असणार्‍या 36 व्यक्तींचा न्यूरोइमेजिंग डेटा तपासणी केल्यानंतर संशोधकांना आढळले की, त्यांच्याकडे चहा न पिणार्‍यांच्या तुलनेत जास्त संघटित मेंदू क्षेत्र होते. अभ्यासात सहभागी लोकांनी आठवड्यात कमीतकमी चार वेळा ग्रीन टी, ऊलोंग चहा किंवा काळाचहा प्यायला होता.

हृदयाची घ्या काळजी
एमोरी युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनुसार, हृदयाची चांगली देखभाल आणखी एक फायदा म्हणजे हे मेंदूसाठी चांगले आहे. जे लोक चांगल्या आरोग्यासाठी ब्लड शुगर, सीरम कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर, बॉडी मास इंडेक्ट, फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी, डाएट, सिगरेट पिणे कमी करतात त्यांचा मेंदू जास्त निरोगी असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून ओले.

विसरणे
टोरंटो युनिव्हर्सिटीच्या संशोधकांना आढळले की, विसरणे मेंदूसाठी चांगले आहे. कोणत्याही आठवणीचे लक्ष्य हे नाही की, अचूक माहिती देणे, तर केवळ बहुमूल्य माहिती देऊन कोणत्याही विषयात योग्य निर्णय घेण्यास मदत करणे आहे.