घरात ‘या’ ठिकाणी घड्याळ लावणं ‘अशुभ’ ! जाणून घ्या काय सांगत ‘वास्तू’शास्त्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – घर असो वा ऑफिस प्रत्येक काम वास्तूच्या हिशोबाने करणे गरजेचे असते. वास्तूच्या मागे असलेले वैज्ञानिक कारण अद्याप अनेकांच्या लक्षात आलेले नाही. घर किंवा ऑफिसमध्ये एखादी जागा निश्चितपणे घड्याळ लावण्यासाठी ठेवलेली असते. कधीकधी लोक घरातील कोणत्याही भिंतीवर घड्याळ लावतात परंतु वास्तुशास्त्राच्या हिशोबाने असे करणे चुकीचे आहे.

घरातील कोणत्याही कोपऱ्यात किंवा भिंतीवर घड्याळ लावताना काही महत्वाच्या बाबी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

1. दक्षिण दिशेला असलेल्या घरामध्ये कोणत्याही भिंतीवर घड्याळ लावणे अशुभ आहे.

2. वास्तुशास्त्रानुसार पूर्व, पश्चिम आणि उत्तर च्या दिशेने घड्याळ लावणे अगदी योग्य आहे. असे केल्याने घरात सकारात्मक वातावरण राहते.

3. वास्तुशास्त्रानुसार घरात आणि ऑफिसमध्ये भिंतींवर पॅनडुलम क्लॉक म्हणजेच घंटा असलेले घड्याळ लावणे शुभ समजले जाते. यातून येणाऱ्या आवाजाने पॉजिटीव्ह एनर्जी तयार होते.

4. मुख्य दरवाजाच्या वर किंवा ठीक समोर घड्याळ लावणे अशुभ मानले जाते त्यामुळे या जागेवर चुकूनही घड्याळ लावू नका.

5. विवाहित जीवनाचा आनंद घेणाऱ्यांनी सुद्धा आपल्या बेडपासून घड्याळ दूरच ठेवले पाहिजे

6. वास्तुशास्त्रानुसार भिंतीवर लावलेले घड्याळ जर खराब असेल तर ते सुद्धा अशुभ मानले जाते.

7. जर तुम्ही तुमच्या बेडरूमसाठी एखादे नवीन घड्याळ घेतले असेल तर त्याला अशा ठिकाणी लावा जेणेकरून त्याचे तोंड पूर्व दिशेला असेल.

Visit : Policenama.com