‘डॉक्टर्स आणि नर्सवर हल्ला करणाऱ्यांचं ब्रेनवॉश करण्यात आलंय’ : अभिनेत्री रवीना टंडन

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार रवीन टंडन हिनं एक नवीन अभियान सुरू केलं आहे. याचा हेतू अफवांच्या प्रसारावर अंकुश ठेवणं आणि सर्व वैद्यकीय क्षेत्रातील लोकांवर हल्ला न करणं, हिंसा होऊ न देणं हा आहे. रवीना टंडनं नेहमीच अनेक मुद्द्यांवर भाष्य करत असते.

रवीनानं इंस्टावर #JeetegaIndiaJeetengeHum असं एक अभियान सुरु केलं आहे. रवीना सांगते की, “कॉविड 19 च्या युद्धात डॉक्टररूपी देवच सर्वांच्या पुढे आहेत. त्यांच्यावर अनेक हल्ले होताना दिसत आहेत. डॉक्टर, नर्स सैनिक हे सर्व या युद्धात पुढे आहेत. काही लोक त्यांच्यावरच हल्ला करत आहेत. काही लोक त्यांच्यावर थुंकत आहेत. दगड विटा मारत आहे. त्यांचं असं रक्त सांडताना पाहून मला रोज निराशा होते.”

पुढे रवीना म्हणते, “ही दु:खद बाब आहे की असं करणारे आपल्याच देशातील लोक आहेत. अज्ञानामुळं अनेक लोक खोट्या बातम्या पसरवताना दिसत आहेत. कोरोना व्हायरस काय आहे, कसा पसरतो याची योग्य माहिती त्यांना नाहीये. नाहीतर कोणी असं वाचवायला येणाऱ्या डॉक्टरांवर हल्ला का करेल. ते कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या ब्रेनवॉशचे शिकार आहेत. लोकांमध्ये सुधारणा करण्याची त्यांना जागरूक करण्याची गरज आहे. डॉक्टर केवळ तुमचं जीवन वाचवण्यासाठी आहेत.