Air Pollution | वायू प्रदूषणामुळे गर्भवती महिलांच्या बाळाला अस्थमाचा धोका असतो का? अभ्यासातून धक्कादायक माहिती उघड

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – Air Pollution  | वायू प्रदूषणातील अति-सूक्ष्म कणांचा सामना करणाऱ्या गर्भवती महिलांवर एक अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये हे समोर आले की, वायू प्रदूषणातील अति सूक्ष्म कणांचा सामना करणाऱ्या महिलांपासून जन्मलेल्या 18 टक्के मुलांमध्ये अस्थमा असल्याचे दिसले आहे. गर्भवती असताना महिलांच्या पोटातील बाळाला अस्थमा असणाचा धोका जास्त असल्याचेही समोर आले आहे.

अभ्यासात अति सूक्ष्म कणांचे मूल्यांकन केले गेले. जे मोठ्या कणांपेक्षा जास्त विषारी असू शकतात. अति-सूक्ष्म कणांमध्ये गाडी आणि चुलीचा स्त्रोत मानला जातो. महिला आणि त्यांच्या मुलांवर केले गेल्या अभ्यासातून हे समोर आले की, गरोदरपणात वायू प्रदूषणाचे अति-सूक्ष्म कण माता आणि तिच्या बाळाकडे हस्तांतरीत होत असतात.

वायू प्रदूषणचे अति-सूक्ष्म कण अर्भकांसाठी धोक्याचे?

अति सूक्ष्म कण गरोदर महिलांच्या फुफ्फुसाच्या माध्यमातून रक्तप्रवाहात सूज निर्माण करते. तर प्लेसेंटाच्या माध्यमातून भ्रूणच्या प्रवाहात पोहोचू शकते. न्यूयॉर्कमधील आयकन स्कूल ऑफ मेडिसीनच्या अभ्यासकांनी सांगितले की, बालपणातील अस्थमा जगभरात मोठी समस्या बनत आहे. त्यामुळे भ्रूणला विशेष करून ऑक्सिडेटिव्ह तणावाचा धोका असतो. भ्रूणचा विचार अत्यंत संवेदनशील प्रकरण असून, ऑक्सिडेटिव्ह तणावाची समस्या वाढवते.

अति-सूक्ष्म कणांनी प्रभावित मातेच्या 18 टक्के मुलांमध्ये अस्थमा

वायू प्रदूषणामुळे नियोजित वेळेपूर्वी जन्मलेल्या अर्भकामध्ये कमी वजनाचा धोका वाढतो आणि 2019 च्या रिसर्चमध्ये सांगितले की, वायू प्रदूषण प्रेग्नंट महिलांसाठी घातक आहे. त्यात मिसकॅरेजचा धोकाही असतो. अमेरिकन जर्नल ऑफ रिस्पेरेटरी अँड क्लिनिकल केअर मेडिसीनमध्ये नवे रिसर्च प्रकाशित झाले. बोस्टनमधील 400 महिला आणि त्यांच्या मुलांचे मूल्यांकन केले गेले आणि या मुलांना अस्थमा आहे की नाही, याची माहिती घेतली गेली.

Web Title : air pollution does pregnant women exposed to high levels of air pollution cause to have children with asthma study reveals 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Google Pay-Paytm-ATM | गुगल पे आणि पेटीएमचा वापर करून ATM मधून काढून शकता पैसे,

केवळ क्यूआर कोड (QR Coad) करावा लागेल स्कॅन

Intermittent Fasting | काय असतं इंटरमिटेंट फास्टिंग? जाणून घ्या वजन कमी करायची जबरदस्त पद्धत

Blood Sugar | मधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘हे’ पदार्थ अत्यंत ‘घातक’, जाणून घ्या खाण्याच्या कोणत्या गोष्टींपासून रहावं दूर

Omicron Covid Variant | हलक्यात घेऊ नका ‘ओमिक्रॉन’ला, वाढवू शकतो तुमच्या अडचणी;
जाणून घ्या लक्षणं आणि बचावाचे उपाय

Calcium For Bones | ‘या’ 10 कॅल्शियमयुक्त खाद्यपदार्थांचे करा सेवन, हाडे होतील मजबूत;
जाणून घ्या कमतरतेची लक्षणे

Aloe Vera Uses And Side Effects | कोरफडीचा वापर करणाऱ्या महिलांवर होतात ‘हे’ 5 दुष्परिणाम; जाणून घ्या

Sore Throat Problems | सर्दीपासून घसादुखीपर्यंत, गरम पाण्याचे सेवन हा एक प्रभावी घरगुती उपाय