US Elections 2020 : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाचा भलताच ‘कारनामा’, भारताच्या नकाशातून काश्मीर हटवलं अन्….

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकी अध्यक्षीय निवणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले. अनेक ठिकाणी सकाळी मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्या होत्या. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांच्यात अध्यक्षपदासाठी चुरस आहे. त्यातच डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाने नकाशा प्रसिद्ध करत वडील डोनाल्ड ट्रम्प आणि प्रतिस्पर्धी ज्यो बायडन यांच्या समर्थक देशांना दोन रंगात विभागले आहे. पण त्यात भारताचा चुकीचा नकाशा प्रसारित केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांनी ट्विट करत एक नकाशा प्रसिद्ध केला आहे. त्यात म्हटलं, की “बरोबर, मी अंदाज लावलेला निवडणुकीचा नकाशा तयार झाला आहे.” या नकाशात लाल रंगात डोनाल्ड ट्रम्प आणि ज्यो बायडेनचे समर्थन करणारे देश निळ्या रंगात दाखवण्यात आले आहे. या फोटोत कश्मीर हा पाकिस्तानच्या भागाचा भाग म्हणून नकाशावर दाखविण्यात आला आहे. तर बायडेनला समर्थन देणाऱ्या देशात भारताचा समावेश आहे. ट्रम्प यांना पाठिंबा देणाऱ्या देशांमध्ये पाकिस्तान, रशिया आणि इराणचा उल्लेख करण्यात आला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी भारतावर निशाणा साधला
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. मात्र, तरी सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी शेवटच्या अध्यक्षीय चर्चेत पर्यावरणाच्या मुद्द्यावरुन भारतावर निशाणा साधला. हवामान बदलांवर बोलताना त्यांनी म्हटलं, की चीन आणि रशिया व्यतिरिक्त, हवा खराब करण्यासाठी भारतच जबाबदार असल्याचा आरोप केला होता.

दरम्यान, अमेरिकेत ४५ व्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी मतमोजणी सुरू असून, ज्यो बायडेन २३२ मतांसह आघाडीवर आहेत तर डोनाल्ड ट्रम्प याना २२० मते पडली आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी ही निवडणूक जिंकली, तर ते सलग दोन वेळा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणारे चौथे व्यक्ती ठरतील.