अतिक्रमण काढतांना कोणाचाही मुलाहीजा बाळगू नका : अजित पवार

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन –   उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी शनिवारी भल्या सकाळी बारामतीत येथे जाऊन पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी नदी-ओढ्याभोवतीची अतिक्रमणं तातडीने हटवा. अतिक्रमण काढताना कोणाचाही मुलाहिजा बाळगू नका, भले ते अतिक्रमण अजित पवारांचे असले तरी काढून टाका, असे दादा स्टाईल आदेश देत अधिकाऱ्यांना तत्पर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळं येणाऱ्या काळात नदीपात्रांसह ओढे मोकळा श्वास घेतील, असं म्हणायला हरकत नाही.

बारमती येथील नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी केली. वर्षानुवर्षे नदीपात्रासह ओढे अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत. त्यामुळं अतिवृष्टी किंवा पुराच्या काळात मोठं नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर नद्यांसह ओढ्याभोवतालची अतिक्रमणे त्वरीत काढावीत असे आदेश दिले. यावेळी त्यांनी ठिकठिकाणी ग्रामस्थांशी संवाद साधत अधिकारी वर्गालाही सूचना दिल्या. पूरस्थिती टाळण्यासाठी नद्यांचे खोलीकरण करण्यासह नदी आणि ओढ्यांच्या परिसरातील अतिक्रमणे काढण्याची सूचना त्यांनी केली.अजित पवार हे आपल्या कामाच्या पद्धतीमुळे नेहमीच चर्चेत असतात. कोणत्याही कामाबाबत तत्पर निर्णय ही खासियत असलेल्या अजित पवार यांनी आज नदी खोलीकरणासारख्या महत्वपूर्ण कामाबाबत सूचना केल्या आहेत.

उजनी धरण परिसरातील परिस्थितीची पाहणी

उपमुख्यमंत्री पवार यांनी आज सकाळी सात वाजताच बारामती शहरातील भिगवण रस्त्यावरुन बाधित क्षेत्राची पाहणीला सुरुवात केली. त्यांनी भिगवण रस्त्यासह तांदुळवाडी, चांदगुडे वस्ती, खंडोबानगर, कऱ्हावागज-अंजनगाव पूल आणि बंधारा, पाहुणेवाडी, गुणवडी परिसराची पाहणी केली. त्यानंतर सणसर, जंक्शन, निमगाव केतकी येथे पाहणी करून त्यांनी उजनी धरण परिसरात जाऊन परिस्थितीची माहिती घेतली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेवून प्रशासकीय यंत्रणांना सतर्क रहाण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या.