डॉ.आंबेडकर विचार साहित्य संमेलन सासवडला

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन ( संदीप झगडे ) – सिध्दार्थ सामाजिक विकास प्रतिष्ठान हरगुडे व समविचारी संस्था संघटना यांनी एकत्रित येवुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार साहीत्य संमेलनाचे आयोजन आज रविवार दि. १९ जानेवारी २०२० रोजी सासवड येथे  केलेले आहे. या संमेलनाचे उद्घाटन खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते होणार असुन व संमेलनाध्यक्ष उचल्या कादंबरीचे सुप्रसिध्द लेखक लक्ष्मण गायकवाड हे आहेत. तर स्वागताध्यक्ष म्हणून माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे हे आहेत. या संमेलनाचे प्रमुख पाहुणे मा. न्यायमुर्ती बी. जी. कोळसे पाटील व डॉ. शशी राय हे आहेत. या उद्घाटन सत्रात काही निवडक लोकांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून पुरस्कार देण्यात येणार आहे, त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजीक सेवा सन्मान राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता सन्मान पत्रकार योगेश बोरसे यांस व डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट कला सन्मान “कॉपी” सिनेमा दिग्दर्शक दयासागर वानखेडे यांना देण्यात येणार आहे.

याच सत्रात पुरंदर तालुक्याचे नुतन आमदार संजय जगताप व पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनिल लोणकर यांचा देखील सन्मान करण्यात येणार आहे असे संयोजन कमिटीचे अध्यक्ष पंकज धिवार यांनी सांगितले. तसेच त्यांनी  यावेळी माहिती देताना असे सांगितले की, प्रथम सत्रात, फुले -शाहू -आंबेडकर यांचा महिला सक्षमीकरना विषयीचा दृष्टीकोन अशा आशयाचा परिसंवाद ठेवण्यात आलेला आहे. त्यांमध्ये अध्यक्षस्थानी पुण्यनगरीच्या संपादिका राही भिडे आहेत व डॉ. मनिषा गुप्ते, डॉ. निशा भंडारे, डॉ. नुतन माळवी या सहभागी होणार आहेत. दुपारच्या जेवनानंतरच्या सत्रात शाहिर सागर गोरखे व संच यांचा प्रबोधनपर गाण्यांचा कार्यक्रम होणार असुन समारोपामध्ये जेष्ठ साहित्यिक विचारवंत उत्तम कांबळे बोलणार आहेत.

या कार्यक्रमाचे आयोजन सासवड येथील आचार्य अत्रे सभागृहात केल्याचे संयोजकांनी सांगितले. यावेळी संयोजन राजेश चव्हाण, स्वप्निल घोडके, दादा गायकवाड, रवी वाघमारे, नितेष पवार, स्वप्निल कांबळे आदी कार्यकर्ते करित आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like