न्यूरो सर्जन उमेदवारी अर्जावर सह्या करण्यास विसरले !

पहिल्यांचा तर चक्क अर्जच विसरले

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तीन मंत्री, एक खासदार, तीन आमदार सज्ज असताना भाजपाचे उमेदवार असलेले न्युरोसर्जन डॉ. सुजय विखे हे उमेदवारी अर्जावर सह्या करण्यास विसरले होते. त्यामुळे घाईघाईत बाजूला होऊन त्यांनी अर्जावर सह्या केल्या. सुशिक्षित उमेदवार असल्याचा प्रचार करणाऱ्या उमेदवारच स्वतः सह्या करण्यास विसरल्याने त्यांचे पितळ चांगलेच उघडे पडले आहे.

आज दुपारी बारा वाजता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी डॉक्टर सुजय विखे जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राज्यातील तीन कॅबिनेट मंत्री, विद्यमान खासदार, तीन आमदार उपस्थित होते. सर्व तयारी होऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी उमेदवारी अर्जाव सह्याच झाल्या नसल्याच्या प्रकार लक्षात आला. त्यामुळे विखे यांची चांगलीच फजिती झाली. बाजूला एका झाडाखाली जाऊन त्यांनी पटकन उमेदवारी अर्जावर सह्या केल्या.

सुशिक्षित असल्याच्या गप्पा झोडणारे न्युरोसर्जन डॉक्टर स्वतःच्या उमेदवारी अर्जावर सह्या करण्यास विसरल्याने दिवसभर सोशल मीडियावर हे चांगलेच ट्रोल झाले. तसेच टीकेचे लक्ष बनले होते.

पहिल्यावेळी अर्जच विसरले डॉ. सुजय विखे हे फक्त उमेदवारी अर्जावर सह्या करायला विसरले नाही, तर तीन वेळेस अर्ज दाखल करणारे विखे पहिल्यांदा अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. मात्र त्यांच्यासोबत उमेदवारी अर्ज नव्हता. त्यामुळे विखे चांगले संतापले व घाईत उमेदवारी अर्ज मागवून घेण्यात आला. मात्र त्या अर्जावर सह्याही केलेल्या नव्हता. त्यामुळे विखेंची झालेली तारांबळ चांगलाच चर्चेचा विषय ठरली आहे.