‘जिस थाली में खाते हैं, उसी में छेद करते हैं’, जया बच्चनच्या आरोपांना रवि किशननं दिलं ‘सडेतोड’ उत्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलिवूडमध्ये पसरलेल्या ड्रग्सच्या प्रकरणावर राज्यसभेत आज मंगळवारी सपाच्या खासदार जया बच्चन यांच्या विधानावर भाजपचे खासदार रवी किशन यांनी उत्तर दिले आहे. रवी किशन म्हणाले की, माझ्या देशातील तरुणांना वेडे होऊ देणार नाही, माझा जीव गेला तरी चालेल.

रवी किशन म्हणाले की, जयाजींकडून अशी अपेक्षा नव्हती. मी सेंट्रल हॉलमध्ये त्यांच्या पाया पडतो. आम्हाला वाटले की त्या पाठिंबा देतील. जगातील सर्वात मोठा चित्रपट उद्योग एका प्लॅन अंतर्गत संपवला जात आहे. जयाजींनी माझे विधान ऐकलेच नाही. आपल्याला हा उद्योग वाचवायचा आहे.

ते पुढे म्हणाले की, आम्ही हा आवाज उठवत आहोत, तर माझे वरिष्ठ एकत्र यावेत अशी माझी इच्छा होती. जरी त्यांचा पक्ष वेगळा असेल, पण माझ्या देशातील तरुणांना वेडे बनवू शकत नाही. माझा जीव गेला तरी, मी वेडे होऊ देणार नाही.

रवी किशन म्हणाले की, हा अनेक हजार कोटींचा व्यवसाय आहे. काल मी आवाज उठवला आणि माझ्या समर्थनाऐवजी मला अपमानित केले गेले. मी तोच आहे ज्याने म्हटले होते की, जिंदागी झंड बा फिर भी घमंड बा, जेव्हा माझ्याकडे एक चित्रपट नव्हता.

ते पुढे म्हणाले की, मी रांगत वर आलो आहे. मी ताटात छिद्र केले नाही. मी एका सामान्य पुरोहिताचा मुलगा आहे आणि आज मी कोणत्याही पाठिंब्याशिवाय इथपर्यंत पोहोचलो आहे. मी ६५० चित्रपट केले आहेत. मी योगीजींचे मनापासून आभार मानतो, त्यांनी चांगले काम केले आहे.

वास्तविक जया बच्चन यांनी ड्रग्स प्रकरणात येणाऱ्या विधानांवरून बॉलिवूडच्या बदनामीबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यांनी लोकसभेत रवी किशन यांच्या विधानाला उत्तर देत म्हटले, ‘लोक बॉलिवूडला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. बॉलिवूडला बऱ्याच दिवसांपासून बदनाम केले जात आहे. असे काही लोक आहेत, जे ज्या ताटात खातात त्याच ताटात छिद्र करतात. हे चुकीचे आहे.’