औषधाशी संबंधित ‘हे’ नियम बदलणार, आता नावे एकसारखी असणार नाहीत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – औषधांची नावे आणि त्यांचे पॅकेजिंग अगदी एकसारखे असल्यामुळे लोक या औषधांमध्ये फरक करू शकत नाहीत आणि चुकून वेगळीच औषधे खातात. अनेक औषधे अशी आहेत ज्यांच्या ब्रँडचे नाव एकच असते परंतु ते एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न असतात.

त्यामुळे यावर उपाय म्हणून सरकार औषध कंपन्यांना वेगवेगळ्या औषधांसाठी समान ब्रँड नेम वापरण्यावर बंदी आणणार आहे. यासाठी आरोग्य मंत्रालयाने ड्रग्स आणि कॉस्मेटिक नियमांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सेंट्रल लायसनिंग अ‍ॅथॉरिटीला (Drugs and Cosmetic Rule) औषधांच्या ब्रँडच्या नावाचे नियमन करण्याचा अधिकार देण्याच्या तरतुदीचा समावेश असेल.

कंपन्यांना औषधांच्या ट्रेडचे नावही रजिस्टर करावे लागेल-

एका इंग्रजी वृत्तपत्रातील वृत्तानुसार, कंपन्यांना औषधांच्या जेनेरिक नावाला मान्यता दिली जाते. हे समान नावाच्या दोन औषधांना वाव तयार करते. नवीन नियम अस्तित्त्वात आल्यानंतर कंपन्यांना औषधांच्या व्यापाराचे नावही नोंदणीकृत करावे लागेल. त्यांना सरकारला हे देखील सांगावे लागेल की त्यांच्या माहितीनुसार बाजारात त्या ब्रँड नावाचे कोणतेही औषध नाही. याविषयी त्यांना सरकारला माहिती द्यावी लागेल.

या संदर्भात फार्मास्युटिकल कंपनीला फॉर्म 15 मध्ये प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल. त्यामध्ये त्या ब्रँडच्या नावाने दुसरे कोणतेही औषध नाही. ब्रँड नावामुळे ग्राहकांमध्ये कोणताही गोंधळ होणार नाही. हे नमूद करावे लागेल.

Visit : Policenama.com 

 

Loading...
You might also like