दिवाळी बोनस न दिल्यानं त्यानं चक्क मालकाचे ‘दात’च पाडले

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – दिवाळी देशभरात सर्वत्र मोठया उत्साहात साजरी केली जाते. दिवाळीनिमित्त कर्मचारी, कामगारी आणि मजूरांना बोनस देण्याची प्रथा गेल्या अनेक वर्षापासुन आहे. कंपनीच्या संचालकांकडून तसेच मालकांकडून स्वखुशीनं कामगारांना बोनस दिला जातो. मात्र, औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बोनस न दिल्यानं एका मजुरानं चक्क मालकाचे दात पाडले आहेत. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिवाळीचा बोनस नंतर देतो असे सांगणार्‍या भिमा चंद्रदेव जोशी (50, रा. उत्तरानगरी, औरंगाबाद) या लेबर कॉन्ट्रक्टरला मजूरानं शिवीगाळ करून चांगलाच मार दिला आहे. ही घटना दि. 26 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास चिकलठाणा एमआयडीसी येथील उत्तरानगरी येथे घडली आहे. याप्रकरणी बाळू पठारे (रा. गांधीनगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पठारेनं जोशी यांच्याकडे बोनसची मागणी केली होती. मात्र, जोशींनी दिवाळीनंतर बोनस देतो असं सांगितलं. त्याचा राग मनात ठेवुन पठारेनं जोशी यांना मारहाण केली. त्यामध्ये जोशींचे दातच पडले. याप्रकरणी पोलिस दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Visit : Policenama.com