‘टिप टिप बरसा पाणी’ गाण्याच्या शुटींग दरम्यान आला होता ‘ताप’ अन् ‘प्रॉब्लेम’, रवीना टंडननं सांगितल्या अनेक गुलदस्त्यातील गोष्टी

पोलीसनामा ऑनलाईन :1994 साली रिलीज झालेल्या मोहारा या सिनेमातील टिप टिप बरसा पानी हे गाणं अभिनेत्री रवीना टंडन हिच्या करिअरमधील असं एक गाणं आहे ज्याला क्वचितच कोणी विसरेल. जेव्हा कधी लोक हे गाणं ऐकतात त्यांना रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांचा चेहरा आठवल्याशिवाय रहात नाही. दोघांची केमेस्ट्री एवढी छान आहे की, चाहते आजही हे गाणं पाहणं पसंत करतात.

रवीनानं एका मुलाखतीत शुटींगनंतर काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या कोणाही माहिती नसतील. शुटींगनंतर त्या दिवशी तिला किती ताप होता याचाही खुलासा तिनं केला आहे.

रवीना म्हणाली, “या गाण्याच्या शुटींगसाठी एक कंस्ट्रक्शन साईटवर चार दिवस थांबावं लागलं होतं. जिथे सगळीकडे दगड पडले होते ज्यावर आम्हाला डान्स करायचा होता.” रवीना सांगते की, जे पाणी रवीनाच्या अंगवार टँकरनं टाकंलं ते एवढं थंड होतं की, तिला खूप ताप आलेला. याशिवाय याचदिवशी तिला पीरियड्सही आले होते ज्यामुळं गाण्याची शुटींग करताना खूप अडचण आली होती.

एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना रवीना म्हणाली होती की, प्रोवोकिंग साँग करण्यासाठी ती कधीच कंफर्टेबल नव्हती. परंतु तिला वाटलं की हे गाणं ठिक होईल. नंतर असंच झालं. जेव्हा गाणं रिलीज झालं तेव्हा या गाण्यानं सर्वांना आपला दीवाना बनवलं.