विधानपरिषद निवडणुकीत ‘महाविकास’चाच ‘झेंडा’, यवतमाळमध्ये दुष्यंत चतुर्वेदी ‘विजयी’

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी यांना पहिल्या पसंतीची २९८ मते मिळाली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे सुमित बजोरिया यांना १८५ मते मिळाली आहेत. त्यामुळे विधान परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे.

शिवसेनेचे तानाजी सावंत हे विधानसभेवर निवडुन गेल्याने त्यांनी राजीनामा दिल्याने ही पोटनिवडणुक झाली. ३१ जानेवारी रोजी पोटनिवडणुक घेण्यात आली होती. त्यात सर्व ४८९ मतदारांनी हक्क बजावल्याने १०० टक्के मतदानाची नोंद झाली होती. महाविकास आघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी आणि भाजपाचे सुमित बाजोरिया यांच्यात ही थेट लढत होती. २ वर्षे १० महिने एवढाच कालावधी असलेल्या या जागेसाठी दोन्ही बाजूने मतदारांना खुश करण्यासाठी कोणतीही कसर सोडली गेली नाही. या लढतीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी गेल्या वर्षी जुलै २०१९ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता.