कानाच्या आतलं इंफेक्शन ठिक होत नाहीये ? जाणून घ्या ‘या’ 5 आयुर्वेदीक टीप्स

पोलीसनामा ऑनलाईन टीम : अनेकांसाठी कानाचं दुखणं एक सामान्य बाब असू शकते. परंतु इंफेक्शन झाल्यानं हा त्रास जास्त वाढू शकतो. यासाठी आज आपण काही आयुर्वेदीक म्हणजेच घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

1) कांदा आणि आलं – कांदा बारीक किसून घ्या आणि एका पातळ स्वच्छ कपड्यात बंडलसारखं टाका. हा लहान बंडल आता कानावर ठेवा आणि एका कुशीवर झोपा. तुम्ही आल्याचाही वापर अशा प्रकारे करू शकता. याचा परिणाम सारखाच आहे.

2) कडूलिंब – कडुलिंबाच्या पानांचा रस 2-3 थेंब किंवा कडुलिंबाच्या तेलाचे 2-3 थेंब तुम्ही कानात टाकू शकता. यामुळं कानाच्या दुखण्यापासून आराम मिळतो. जर तुम्ही कडुलिंबाची पानं अंघोळीच्या पाण्यात टाकली तर संक्रमणापासून दूर राहल.

3) लसूण – यात अँटी बायोटीक आणि अँटी सेप्टीक गुणधर्म असतात. यामुळं दुखणं आणि इंफेक्शन दोन्हीही दूर होतं. मोहरीच्या तेलात लसूनण गरम करून घ्या. यानंतर थंड झाल्यानंतर याचे 2-3 थेंब कानात सोडा.

4) ऑलिव्ह ऑईल – ऑलिव्ह ऑईल हलकं गरम करून घ्या. याचे 3-4 थेंब त्रास होणाऱ्या कानात सोडा. अर्धा तास हे कानात नीट मुरू द्या. यानंतर तुम्ही झोपा म्हणजे हे तेल वाहून बाहेर जाणार नाही.

5) तुळशीचा रस – तुळशीची पानं वाटून त्याचा रस कानात सोडा. असं दिवसातून 2-3 वेळा जर केलं तर कानाच्या दुखण्यापासून आराम मिळेल आणि काही संक्रमण असेल तर तेही दूर होईल.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like