फायद्याची गोष्ट ! IRCTC मध्ये 3999 गुंतवल्यास दरमहा 80000 कमवण्याची ‘सुवर्ण’संधी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्हीही पैशांबाबत परेशान असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वे आता तुम्हाला महिन्याला 80,000 रुपये कमावण्याची संधी देणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 55 % तिकीट हे ऑनलाइन पद्धतीने विकले जातात. आता तुम्ही आईआरसीटीसीच्या माध्यमातून तिकीट विक्रेते होऊ शकता. ज्याच्यावर तुम्ही दर महिन्याला चांगली कमाई करू शकता. यासाठी नेमके काय करावे लागेल जाणून घेऊयात.

अशी असेल रजिस्ट्रेशन प्रोसेस –

– सर्वात आधी ऑनलाइन रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा लागेल.
– आता अर्जावर सही करून डीक्लेरेशन फॉर्म आणि इतर कागदपत्रे स्कॅन करून पाठवावे लागेल.
– कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर आईआरसीटीसी आयडी जनरेट करण्यासाठी तुम्हाला 1,180 रुपये भरावे लागतील.
– ओटीपी आणि व्हिडीओ व्हेरिफिकेशन नंतर डिजिटल सर्टिफिकेट तयार करावे लागेल.
– डिजिटल सर्टिफिकेट भेटल्यानंतर तुम्हाला आईआरसीटीसीचे शुल्क द्यावे लागेल.
– यानंतर आईआरसीटीसी क्रिडेंशियल्स दिले जाईल.

अशा प्रकारे करू शकता कमाई –
– जास्त तिकिटांचे बुकिंग झाले तर तुम्हाला फायदा होईल.
– दर महिन्याला प्रत्येकी 100 तिकीट बुक केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक तिकिटावर 10 रुपये बुकिंग शुल्क द्यावा लागेल.
– 101 ते 300 तिकट बुक केल्यानंतर तुम्हाला चार्ज म्हणून आठ रुपये द्यावे लागतील.
– 300 पेक्षा अधिक तिकीट बुक केल्यानंतर हे चार्जेस पाच रुपयांनी वाढतात.

एवढे असेल कमिशन –
जर तुम्ही स्लीपर किंवा सेकंड सीटचे नॉन एसी तिकीट बुक करता त्यावेळी तुम्हाला 20 रुपये प्रती पीएनआर आणि एसीच्या कोणत्याही तिकिटावर 40 रुपये प्रती पीएनआर कमिशन मिळते. या हिशोबाने जर तुम्ही महिन्याला दोन हजार एसी तिकिटांची विक्री करता तर तुम्ही तब्बल 80 हजार रुपयांपर्यंत कमाई करू शकता.

IRCTC एजंट होण्यसाठी हे आहेत दोन प्लॅन –
1) यासाठी तुम्हाला पहिल्या आणि दुसऱ्या वर्षासाठी 3,999 रुपये म्हणजेच दोन वर्षांसाठी एकूण 7,998 रुपये रजिस्ट्रेशन शुल्क द्यावे लागणार आहे.

2) यानुसार तुम्हाला पहिल्या वर्षी 6,999 रुपये द्यावे लागतील. दुसऱ्या वर्षांमध्ये तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाहीत.

ही लागतील कागदपत्रे –

– पॅन कार्ड
– आधार कार्ड
– फोटो
– रहिवासाचा पुरावा
– निवासी पत्ता पुरावा
– घोषणा पत्र
– नोंदणी पत्रक

Visit : Policenama.com