रिकाम्यापोटी लसूण खाल्ल्यानं पोट साफ होण्यासह होतात ‘हे’ 4 मोठे फायदे ! गंभीर आजारही राहतात दूर, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   यंपाकघरात लसूण सहज उपलब्ध होतो. जेवण बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. लसणाचे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदे होतात. रिकाम्या पोटी जर लसणाचं सेवन केलं तर याचे अनेक लाभ होतात. याचबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

1) पचनक्रिया सुधारते – रोज सकाळी लसूण खाणाऱ्या लोकांची पचनक्रिया चांगली राहते. यामुळं पोटाचे अनेक विकार दूर होतात. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर यासाठीही लसणचा खूप फायदा होतो. अनेकांना रक्त गोठण्याची समस्या उद्भवत असते. लसूण खाल्ल्यानं रक्त पातळ होण्यास मदत होते. यामुळं ब्लड कोटींग थांबतं.

2) गंभीर आजारांपासून बचाव – जर सकाळी पाण्यासोबत कच्चा लसूण रिकाम्यापोटी खाल्ला तर शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास खूप मदत होते. शरीर डिटॉक्स करण्याचा हा सोपा मार्ग आहे. याच्या मदतीनं तुम्ही मधुमेह, कॅन्सर, डिप्रेशन अशा अनेक आजारांपासून स्वत:चा बचाव करू शकता. रक्तातील साखरेची पातळी आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी लसणाच्या सेवनाचा खूप फायदा होतो. जर 1-2 आठवडे लसणाचं योग्य प्रमाणात सेवन केलं तर रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. सोबतच यामुळं कोलेस्ट्रॉलची पातळीही संतुलित राहते.

3) हाडांसाठी फायदा – हाडं मजबूत होण्यासाठी नियमित कच्चा लसूण खायला हवा. यामुळं तुमच्या शरीराला कॅल्शियमचा पुरवठा होतो. यामुळं ऑस्टियोपोरोसिस सारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो. याशिवाय लसणात अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. जर तुम्हाला दातदुखीचा त्रास होत असेल तर अशात लसणाच्या सेवनाचा खूप फायदा होतो. जर दात दुखत असेल तर लसणाची पाकळी गरम करून दुखत असलेल्या दाताच्या खाली ठेवावी. यामुळं तुम्हाला आराम मिळेल.

4) रोगप्रतिकारक शक्ती वाढते – लसणात अॅलिसीन नावाचं कंपाऊड असतं. याची मदत सर्दी-खोकल्याची समस्या कमी करण्यासाठी होते. याचं योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात सेवन केलं तर रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. परिणामी तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहता.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.