रितेश देशमुखच्या मुलांनी बनवला ‘ईको-फ्रेंडली’ गणपती, वायरल होतोय व्हिडीओ

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन –   बॉलीवुड अ‍ॅक्टर रितेश देशमुखची मुले रेयान आणि राहिल यांनी न्यूजपेपरपासून ईको-फ्रेंडली गणपती बनवला आहे. व्हिडिओमध्ये रितेश आपल्या मुलांसोबत दिसत आहे. रितेश आणि त्याच्या मुलांचा हा व्हिडिओ वेगाने वायरल होत आहे.

https://www.instagram.com/riteishd/?utm_source=ig_embed

रितेश देशमुखने शनिवारी आपल्या इंस्टाग्रामवर मुलांचा हा व्हिडिओ शेयर केला. त्याने व्हिडिओ शेयर करताना लिहिले, गणपती बप्पा मोरया, हॅप्पी गणेश चतुर्थी. तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियाना सुख आणि समृद्धीच्या शुभेच्छा. रेयान आणि राहिलने ईको-फ्रेंडली गणपती बनवला आहे.

रितेशच्या या पोस्टवर फॅन्स खुप रिअ‍ॅक्शन देत आहेत आणि लागोपाठ कमेंट करत आहेत. काही तासातच या पोस्टला 6 लाखांच्यावर व्ह्यूज झाल्या. एका फॅनने कमेंट केले की, खुप क्यूट आणि शानदार रचनात्मकता।’ दुसर्‍याने लिहिले आहे, ’ अति सुंदर!

रितेशने मागच्या वर्षी आपला व्हिडिओ ट्विट करत लिहिले होते की, घरी मातीने गणपतीची मूर्ती बनवली. आपल्या पर्यावरणासाठी जबाबदार होत आहे. आशा आहे की, आपण आपल्या मुलांसाठी एक चांगले आणि स्वच्छ प्लॅनेट ठेवू शकतो. ते तेच शिकतात, जे पाहतात. हॅप्पी गणेश चतुर्थी. तुम्हा सर्वांना सुख-समृद्धीच्या शुभेच्छा.