शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरासह कार्यालयावर ED ची छापेमारी

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरासह कार्यालयावर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) छापेमारी केली आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीने सकाळीच धाडसत्र सुरू केलं. त्याचसोबत सरनाईक यांचे सुपुत्र विहंग सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घरीही ईडीने कारवाई सुरू केली आहे. प्रताप सरनाईक आणि त्यांचे पुत्र देशाबाहेर असून, त्यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यासोबत मुंबईत अन्य १० ठिकाणी ईडीची छापेमारी सुरू आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ही कारवाई सुरू असल्याची माहिती मिळत आहे. सरनाईक यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना ईडीने बोलावले आहे. शिवसेनेच्या इतर नेत्यांनाही ईडीने नोटिसा दिल्याचे समजत आहे.

दरम्यान, या सर्व प्रकरणांवरती प्रतिक्रिया देताना भाजपचे नेते किरीट सोमय्या म्हणाले, “मनी लॉन्ड्रिंगसारख्या प्रकरणात शिवसेना पटाईत आहे. त्यांचे मुखिया यामध्ये अग्रेसर आहेत. यामुळे मला याबाबत कोणतेही आश्चर्य वाटत नाही. मुंबईत माफिया राज असल्याचा आरोप मी यापूर्वीही केला आहे. पालिकेतून कत्रांट, भागीदारीतून प्रचंड पैसा येतो,” याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

You might also like