ED Summons to Sanjay Jaiswal | बीएमसीचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांना पुन्हा ईडीचे समन्स

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ED Summons to Sanjay Jaiswal | मुंबई महापालिकेचे (Mumbai Municipal Corporation) तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल (Sanjiv Jaiswal) यांना सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच ईडीने (ED Summons) समन्स बजावले आहे. मुंबई पालिकेतील कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी जयस्वाल यांना समन्स (ED Summons to Sanjay Jaiswal) बजावले आहे. काही दिवसांपूर्वी ईडीकडून मुंबई पालिकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबई, ठाण्यासह अनेक ठिकाणी छापेमारी (Raid) करण्यात आली होती. त्यावेळी जयस्वाल यांच्याही घरी छापा टाकला होता.

संजीव जयस्वाल (Sanjay Jaiswal) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ईडी अधिकाऱ्यांना जे रोख रकमा आणि मालमत्ता सापडल्या आहेत. यापैकी बहुतेक मालमत्ता या संजीव जयस्वाल आणि त्यांच्या पत्नीशी संबंधित आहे. याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, आता जयस्वाल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, ईडीने काही दिवसांपूर्वी मुंबईत (Mumbai) 15 हून अधिक ठिकाणी छापेमारी केली. कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ही छापेमारी करण्यात आली होती. याचप्रकरणी ईडीने आता मुंबई पालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. कोविड घोटाळा प्रकरणी (The Case Of The Covid scam) ईडीकडून संजीव जयस्वाल यांच्या घरी छापेमारी करण्यात आली होती. तसेच त्यांना गुरुवारी चौकशीसाठीसुद्धा बोलवण्यात आले होते. मात्र काही महत्त्वाच्या कामांत असल्यामुळे जयस्वाल चौकशीसाठी हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे ईडीने त्यांना पुन्हा समन्स बजावले आहे.

दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार, लाईफलाईन हॉस्पिटल (Lifeline Hospital) मॅनेजमेंट सर्विसेस हॉस्पिटलच्या टेंडर बोलीच्या वेळी संजीव जयस्वाल अतिरिक्त महापालिका आयुक्त होते आणि महत्त्वाचे म्हणजे स्थापन करण्यात आलेल्या समितीचा भाग होते. ज्यांनी लाईफलाईन हॉस्पिटलला मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीला टेंडर दिले.

Web Title : ED Summons to Sanjay Jaiswal | former additional commissioner of mumbai municipal corporation sanjeev jaiswal was summoned by ed in bmc covid scam case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा