NCP MP Supriya Sule | ‘नेहमी अंब्याच्या झाडालाच दगड मारले जातात…’, सुप्रिया सुळेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

ADV

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी आमच्यासोबत डबलगेम केला त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपचं (BJP) सरकार आलं नाही, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आम्ही गुगली टाकला तुम्ही विकेट दिली तर आम्ही काढणारच असा पलटवार शरद पवार यांनी केला. (Maharashtra Politics News) त्यावरही फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. अशात आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. 55 वर्षात शरद पवारांवर वार केल्याशिवाय हेडलाईन होत नाही असं सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) म्हणाल्या.

अंब्याच्या झाडाला नेहमी दगड मारले जातात…

महागाई वाढत आहे, टोमॅटोचे दर किती वाढले आहेत ते पहा, शेतकऱ्यांचं वास्तव, महागाईमुळे सामान्यांचे कंबरडं मोडलं गेल्याचे दिसत आहे. (Maharashtra Politics News) अशात राजकीय चर्चा घडत आहेत. कुठल्याही लोकशाहीत राजकीय हल्ला करणं काही गैर नाही. शरद पवार यांच्यावर वार करत नाही तोपर्यंत बातमी होत नाही हे 55 वर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. आंब्याच्या झाडाला नेहमी दगड मारले जातात, बाभळीच्या नाही, असं म्हणत सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी फडणवीसांना टोला लगावला.

गॉसिप करण्यात सरकार मग्न

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, माननीय देवेंद्रजी इतक्या त्या शपथविधीमध्ये अडकले आहेत कारण त्यांना मूळ मुद्याला हात घालायचा नाही. राज्यातील प्रत्येक महिलेची जबाबदारी एक बहीण म्हणून त्यांच्यावर आहे. ते गृहमंत्री आहेत म्हणून मी त्यांना विचारत आहे. फडणवीस महागाई, सिलिंडरचे वाढते दर, महिला सुरक्षा, महिलांवर अत्याचार यावर का बोलत नाहीत? त्यांच्याकडे बोलायला काही नाही म्हणून ते दुसरं काहीतरी काढत बसतात. आज त्याचा काही संबंध आहे का? प्रशासन सोडून सातत्याने मागे जाणं, गॉसिप करण्यातच सरकार मग्न असणे हे दुर्दैव असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मला गॉसिप करायला वेळ नाही

मला गॉसिप करायला वेळ मिळतच नाही. मुळात तो विषय एखाद्या च्युईंगम सारखा झाला आहे. च्युईंगम सुरुवातीला खाता तेव्हा गोड लागतं. चघळून चघळून त्याची चव निघून जाते. असं चव गेलेले विषय चघळण्याची सवय भाजपला झाली आहे. महागाईवर कुणीही काहीही बोलत नाही. शरद पवार आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचं ऑब्सेशन भाजपला आहे. त्यामुळेच मी म्हटलं होतं की दादा म्हणजे अमिताभ आहेत. कारण भाजपला शरद पवार आणि अजित पवारांशिवाय काही दिसत नाही, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Web Title :   NCP MP Supriya Sule | stones thrown on mango tree only supriya sule taunts devendra fadnavis on his statement about sharad pawar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा