Pankaja Munde | ‘माझ्याविषयी कोणी सकारात्मक बोलत असेल तर…’, BRS च्या ऑफरवर पंकजा मुंडेंचे सूचक विधान

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) पक्षावर नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. एवढेच नाही तर राष्ट्रवादी (NCP), नव्याने महाराष्ट्रात विस्तार करत असलेल्या बीआरएस या पक्षासह (BRS Party) इतर पक्षांकडून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना पक्षात येण्याची ऑफर दिली जात आहे. पंकजा मुंडे यांनी भाजप सोडण्याचा विचार केला तर, त्या कोणत्या पक्षात जाऊ शकतात, यावर राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. यातच आता मला आलेल्या ऑफरकडे मी बघणार नाही असे नाही, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

बीडमध्ये विनायक मेटे यांच्या जयंतीच्या (Vinayak Mete Jayanti) निमित्तान् एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे एकाच मंचावर दिसतील. सहा महिन्यात देवेंद्र फडणवीस तीन वेळा बीड जिल्ह्यात आले होते. (Maharashtra Politics News) मात्र तिनही वेळी पंकजा मुंडे कार्यक्रमांना उपस्थित राहिल्या नाहीत. त्यामुळे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर दिसणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, एका वृत्तवाहिनीशी बोलताना पंकजा मुंडे यांनी यांनी सूचक प्रतिक्रिया दिली.

आम्ही एकाच व्यासपीठावर येणं ही…

पंकजा मुंडे म्हणाल्या, आम्ही एकाच व्यासपीठावर एकत्र येत आहोत. याची चर्चा होते यात काही मोठी गोष्ट नाही. ही चर्चा होते आहे. मला तर याची कल्पनाही नाही की या गोष्टीची चर्चा होते आहे. आमच्या एकत्र येण्याचं इतकं काही महत्त्वाचं नाही. देवेंद्र फडणवीस आधी ज्या कार्यक्रमांसाठी बीड जिल्ह्यात आले होते त्या कार्यक्रमांना मी जाण अपेक्षितच नव्हतं. आजच्या कार्यक्रमाला मला विनायक मेटेंच्या पत्नीनं बोलावलं आहे. त्यांचा मला फोन आला होता, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

मेटेंशी असलेले राजकीय मतभेद संपुष्टात

विनायक मेटे यांच्यासोबत असलेले राजकीय मतभेत संपुष्टात आले आहेत. विनायक मेटे यांचा अपघातात मृत्यू (Vinayak Mete Accidental Death Case) झाला, त्यांचा अपघात होण्याच्या आठ ते दहा दिवस अगोदर त्यांचा मला फोन आला होता. मला तुमच्याशी बोलायचं आहे, असं मला सांगितलं होतं. त्यांच्या बोलण्यातून लक्षात येत होते की आमच्यात जे काही मतभेद झाले होते ते त्यांना मिटवायचे होते. परंतु त्यांचं आणि माझं बोलणं होऊ शकलं नाही. त्यांचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर मला खूपच हूरहूर वाटली की त्याना नेमकं काय बोलायचं होतं? परंतु आज त्यांच्या परिवाराने कार्यक्रम ठेवला आहे त्याला मी जाण ही संस्कृती असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

माझ्याविषयी कोणी सकारात्मक बोलत असेल तर…

सर्व पक्ष माझ्याविषयी सकारात्मक बोलत आहेत. माझ्याविषयी कोणी सकारात्मक बोलत असेल तर कोणाविषयी मी नकारात्मक बोलण्याचा प्रश्न येत नाही. मला आलेल्या ऑफरवर मी सध्या सिरीयसली बघितले नाही मात्र मी बघणार नाही असे नाही. कारण कोणत्याही व्यक्तीला सिरीयसली न घेणे हा त्यांचा अपमान असतो, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

Web Title : Pankaja Munde | bjp pankaja munde make clear statement about offers from other parties

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा