SSB ASI, SI Admit Card 2020 : एसआय आणि एएसआयच्या लेखी परीक्षेसाठीचे प्रवेश पत्र सशस्त्र सीमा दलानं केलं जारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत सशस्त्र सीमा दलाने (एसएसबी) एसआय आणि एएसआय यांच्या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेसाठी प्रवेश पत्र जारी केले आहेत. ज्या उमेदवारांनी एसएसबीने जारी केलेल्या एसआय (स्टाफ नर्स) आणि एएसआय (ओटीटी, डेंटल टेक्निशियन, रेडिओग्राफर आणि फार्मासिस्ट) या पदासाठी अर्ज केले आहेत, ते दलाकडून घेतल्या जाणाऱ्या लेखी परीक्षेत सामील होण्यासाठी अधिकृत पोर्टल ssbrectt.gov.in वर जाऊन त्यांचे प्रवेश पत्र डाउनलोड करू शकतात.

१३ सप्टेंबर रोजी होणार आहे लेखी परीक्षा
सशस्त्र सीमा दल यांच्या अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या अपडेट माहितीनुसार, एसआय आणि एएसआय भरतीसाठी लेखी परीक्षा पुढील महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात १३ सप्टेंबर २०२० रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षा सर्वोदय कन्या विद्यालय ४२६, मेहरोली-गुडगाव रोड, घिटोरनी, नवी दिल्ली- ११००३० येथे घेण्यात येणार आहे.

परीक्षेत असतील २ पेपर
एसएसबी, एसआय आणि एएसआय भरती २०१८ अधिसूचनेनुसार, लेखी परीक्षेत प्रत्येकी दोन तासांचे दोन पेपर असतील. पेपर १ मध्ये सामान्य ज्ञान, न्यूमेरिकल ऍबिलिटी, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, सामान्य इंग्लिश/ सामान्य हिंदी आणि जनरल रीझनिंगचे १०० बहुपर्यायी प्रश्न असतील. त्याचबरोबर दुसर्‍या पेपरमध्ये विषयाशी संबंधित प्रश्न असतील. पेपर १ मध्ये किमान ५० टक्के गुण मिळवणाऱ्या उमेदवारांच्याच पेपर २ चे मूल्यांकन केले जाईल. पेपर २ साठीही किमान पात्रता गुण ५०% आहेत.

लेखी परीक्षेनंतर गुणवत्ता चाचणी
लेखी परीक्षेत उत्तीर्ण घोषित केलेल्या उमेदवारांना गुणवत्ता चाचणीसाठी आमंत्रित केले जाईल, जे उमेदवारांच्या अर्ज पदानुसार वेगवेगळे असेल. मात्र गुणवत्ता चाचणी केवळ पात्र स्वरूपाच्या असतील.

उमेदवारांनी लक्षात घ्यावे की, अंतिम निवड लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारेच (पेपर १ आणि पेपर २) केली जाईल.