JEE Main, NEET 2020 : ‘जेईई मेन’ आणि ‘नीट परीक्षा’ दिवाळीनंतर व्हावी, शिक्षणमंत्री घेणार तातडीची बैठक : सुब्रमण्यम स्वामी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोविड -19 साथीच्या दरम्यान वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा जेईई मेन घेण्यास विरोध वाढत आहे. सुप्रीम कोर्टाने परीक्षा स्थगित करण्याची याचिका फेटाळली असली तरीही विद्यार्थी सातत्याने विरोध करीत आहेत आणि वरिष्ठ नेत्यांना हस्तक्षेपाची विनंती करत आहेत. या दरम्यान विद्यार्थ्यांच्या विनंतीवरून भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी कॅबिनेट मंत्री आणि सध्या राज्यसभेचे खासदार असलेले डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे की त्यांनी शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरीयल निशंक यांना नीट 2020 चे दिवाळीनंतर आयोजन करण्याची विनंती केली आहे. तसेच ते म्हणाले, ‘शिक्षणमंत्री नीट परीक्षेसंदर्भात आपत्कालीन बैठक घेत आहेत. पुढे काय होते ते पाहूया.’ त्याचवेळी दुसरीकडे सर्व निषेध असूनही, राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (एनटीए) देशभरात आयोजित करण्यात येणारी वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट 2020 साठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या परीक्षांचे केंद्र (शहर) जारी केले आहेत आणि प्रवेशपत्र लवकरच जारी करण्याची घोषणा केली आहे.

साथीच्या आजाराची सद्यस्थिती लक्षात घेता, पुढच्या महिन्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जेईई मेन 2020 आणि दुसऱ्या आठवड्यात 13 सप्टेंबरला नीट 2020 च्या परीक्षेच्या आयोजनाबद्दल सर्वोच्च न्यायालयात विविध विद्यार्थी आणि इतरांद्वारे याचिका दाखल करण्यात आली होती, ज्यास सर्वोच्च न्यायालयाद्वारे 17 ऑगस्ट 2020 रोजी फेटाळण्यात आले होते. तथापि, यानंतरही विद्यार्थ्यांकडून विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पंतप्रधान, विविध मंत्री आणि नेत्यांना जेईई मेन आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्यासाठी आग्रह केला जात आहे. या दरम्यान विद्यार्थ्यांनी भाजपचे खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांच्याकडेही आवाहन केले. त्याविषयी त्यांनी आज आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘सर्वोच्च न्यायालयाने आधीच आपला निर्णय ऐकवला आहे, हा निर्णय घेऊन बराच काळ लोटल्यानंतर आपण मला या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचे आवाहन करत आहात.’

एका इतर अपडेटनुसार, सर्वोच्च न्यायालयात नीट 2020 आणि जेईई मेन 2020 प्रवेश परीक्षेसाठी दाखल केलेल्या याचिकेत विद्यार्थ्यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अलख आलोक श्रीवास्तव यांनी देखील पंतप्रधान आणि शिक्षणमंत्र्यांना दोन्ही प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याचे आवाहन केले आहे.