एकनाथ खडसेंचं ठरलंय ! 20 डिसेंबरपर्यंत ‘पक्षांतर’ ?

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – गोपीनाथ गडावर झालेल्या मेळाव्यामध्ये एकनाथ खडसे यांनी माझा काही भरवसा नाही, मी केव्हाही पक्ष सोडू शकतो, असा इशारा दिला होता. त्यानंतर त्यांच्या पक्षांतराची चर्चा सुरु झाली. त्यांचे निकटचे कार्यकर्त्यांनी सांगितले की, नाथाभाऊंचं आता निश्चित ठरलंय. 20 डिसेंबरपर्य़ंत त्यांचा नवीन पक्षप्रवेश होणार असल्याचे सांगितले. मात्र, पक्ष कोणता हे कार्यकर्त्यांनाही गुलदस्त्यात ठेवले आहे.

एकनाथ खडसे यांनी गेली चाळीस वर्षे भारतीय जनता पक्षात कार्यरत असल्याने त्यांचे कार्यकर्त्यांचे जाळे मोठे आहे. मंत्रिपद गेल्यानंतर अडचणीच्या काळातही कार्यकर्ते त्यांच्यासोबतच होते. एकनाथ खडसेंवर पक्षाने अन्याय केला असल्याची भावना या कार्यकर्त्यांतही आहे. त्यांनी आता पक्षात न थांबता पक्षांतर करावे, अशी मागणी कार्यकर्त्यांची आहे. परळीत बोलताना त्यांनी आपला काही भरोसा नसल्याचे सांगत पक्ष बदलण्याचे संकेत दिले. खडसे कोणत्या पक्षात जाणार हे अद्याप समजू शकले नसले तरी ते शिवसेना किंवा राष्ट्रवादीमध्ये जाणार हे निश्चित असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांचा आहे.

पक्षांतराचा निर्णय योग्यच !
एकनाथ खडसे हे पक्षाच्या चौकटीत राहणारे नेते आहेत. महाराष्ट्रासह व उत्तर महाराष्ट्रात त्यांनी पक्षाची जडणघडण केली. मात्र, त्यांच्यावर विरोधी पक्षाने नव्हे तर काही लोकांनी आरोपी केल्यानंतर त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांना चौकशीला सामोरे जावे लागले. यामध्ये ते निर्दोष ठरले. त्यानंतर त्यांनी आपण निर्दोष असल्याचे जाहीर करण्याची मागणी पक्षाकडे केली. मात्र, पक्षाने ते निर्दोष असल्याचे जाहीर केले नाही. त्यामुळे जर त्यांनी पक्षांतराचा निर्णय घेतला असेल तर योग्य आहे, असे माजी सरचिटणीस भाजप युवा दीपक फालक यांनी म्हटलं आहे.

भाऊंनी पक्ष बदलावा
मुक्ताईनगरचे भाजप उपजिल्हाध्यक्ष विलास धायडे म्हणाले, एकनाथ खडसेंनी पक्ष विस्तारासाठी सतत झटत राहिले. आरोग्याच्या समस्या असो की मुलाच्या निधनाचे दु:ख असो सर्व काही बाजूला ठेवून त्यांनी केवळ पक्षाचा विचार केला. मात्र, त्या पक्षाने त्यांच्यावर अन्याय केला. त्यामुळे त्यांनी पक्ष बदलाचा निर्णय घ्यावा, त्यांनी घेतलेल्या निर्णयासोबत आम्ही आहोत.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like