रोहिणी खडसेंच्या पराभवावर पिता एकनाथ खडसेंनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया !

मुक्ताईनगर : पोलीसनामा ऑनलाइन –  मागील 5 वर्षांपासून मुक्ताईनगरात शिवसेना-राष्ट्रवादीची छुपी युती होती. त्याचा फटका भाजपला बसला आहे परिणामी कन्या आणि भाजपच्या उमेदवार रोहिणी खडसे यांचा निसटता पराभव झाला असे म्हणत माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी रोहिणी खडसेंच्या पराभवावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ खडसे (नाथाभाऊ) म्हणाले, “या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. उत्तर महाराष्ट्रात भाजपला 40 जागा मिळतील असे गिरीश महाजन यांनी सांगितले होते. मात्र तसे झालेले दिसत नाही. राष्ट्रवादीने ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेऊन शिवसेना बंडखोर चंद्रकांत पाटील यांना पुरस्कृत करण्याची खेळी केली. मागील 5 वर्षांपासून मुक्ताईनगरात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसची छुपी युती होती. त्याचा फटका भाजपला बसला आहे. परिणामी कन्या आणि भाजप उमेदवार रोहिणी खडसे यांचा निसटता पराभव झाला. कार्यकर्त्यांनी खूप परिश्रम घेतले. परंतु ते कुठे चुकले ते शोधावे लागेल” असेही ते म्हणाले.

पक्षाने तिकीट कापल्याने पराभव झाला का असा प्रश्न विचारल्यानंतर एकनाथ खडसे म्हणाले, “मागील 5 वर्षांपासून मुक्ताईनगरात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसची छुपी युती होती. त्यामुळे भविष्यात काय होऊ शकतं याबाबत पक्षाला आधी जाणीव करून दिली होती. पक्षाच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यासही सांगितले होते. परंतु या सगळ्यावर आता जास्त बोलता येणार नाही.” असे त्यांनी सांगितले.

Visit : Policenama.com