निवडणूक आयोगाकडून भाजपला क्लीनचीट, विरोधकांच्या भूवया उंचावल्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या मोफत लसीकरणाचे आश्‍वासन बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दिले आहे. यावरून राजकारण पेटलं. निवडणुक आयोगाकडे विरोधकांनी तक्रार केली. पण निवडणुक आयोगाकडे भाजपला क्लीनचीट दिल्याने विरोधकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

राहुल गांधींचे मित्र, साकेत गोखले यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. निवडणूक आयोगाच्या या क्‍लीनचीटमुळे भाजपला मोठा दिलासा मिळणार आहे. हा आदर्श आचारसंहितेचा भंग किंवा उल्लंघन ठरत नाही, असे निवडणूक आयोगाने आज स्पष्ट केले आहे.

आयोगाने आचारसंहितेतील ३ कलमांचा उल्लेख केला आहे. यामध्ये कोणत्याही पक्षाच्या जाहीरनाम्यात कोणतेही प्रतिकूल आश्‍वासन असू नये, निवडणूक प्रक्रियेचे पावित्र्य व गांभीर्य यांचा भंग होईल व मतदारांवर ज्याचा प्रत्यक्ष प्रभाव पडेल असा मुद्दा त्यात नसावा व जी आश्‍वासने पूर्ण करता येतील तीच आश्‍वासने जनतेला दिली पाहिजेत. या तिन्ही कसोट्यांवर भाजपचे लशीचे आश्‍वासन चुकीचे ठरू शकत नाही असे मत आयोगाने आज व्यक्त केलं आहे.