योगीवर निवडणुक आयोग नाराज

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – ‘मोदीजी की सेना’ अशी घोषणा करणाऱ्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उत्तरावर निवडणुक आयोगाने नाराजी व्यक्त केली आहे. निवडणुक आयोगाने म्हटले आहे की, योगी एक वरिष्ठ नेता आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून आचारसंहिता, कायद्याचे पालन करण्याची अधिक अपेक्षा आहे. त्यांनी अशाप्रकारची भाषणे भविष्यात करु नये, अशी सक्त ताकीद दिली आहे.

योगी आदित्यनाथ यांनी एका भाषणात सैनिकांचा ‘मोदीजी की सेना’ असा उल्लेख केला होता. त्याबाबत खुलासा करण्याचा आदेश दिला होता. त्यावर योगी यांनी खुलासा करताना सांगितले की, सेनेचे सुप्रिम कमांडर राष्ट्रपती आहे. राष्ट्रपती पंतप्रधान आणि वरिष्ठ मंत्र्यांचा सल्ला घेऊन निर्णय घेतात. त्याचा आधार घेऊन सर्वसाधारण बोली भाषेच्या शब्दांचा आपण भाषणात वापर केल्याचा खुलासा केला आहे.

त्यावर निवडणुक आयोगाने नाराजी व्यक्त करताना नेत्यांनी आपल्या पदाला शोभेल अशी भाषेचा वापर करावा.