तैवानच्या लष्करप्रमुखांच्या हेलिकॉप्टरचं आपत्कालीन ‘लॅन्डिंग’, शोध सुरू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तैवानच्या लष्कर प्रमुखांचे हेलिकॉप्टर बेपत्ता झाले असल्याची माहिती समोर येत आहे. प्रवास करत असताना देशाच्या उत्तरेकडील भागात हेलिकॉप्टचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. दरम्यान, आपत्कालीन लँडिंगनंतर नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे त्यांचा शोध घेतला जात असून अपघात झाल्य़ाची शक्यताही वर्तविली जात आहे.

गुरुवारी पहाटे ही घटना घडली असल्याचे समजते आहे. हवाई दल प्रमुख शेन ई मिंग यांच्यासह सैन्य दलांचे अनेक वरिष्ठ अधिकारी या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. दरम्यान, या सर्वांचा शोध युद्धस्तरावर शोध घेण्यात येत आहे.

पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/