नीरा ग्रामपंचायतीने दिवाळी गोड केल्याने कर्मचार्‍यांनी केला आनंद व्यक्त

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन – पुरंदर तालुक्यातील सर्वांत मोठी असलेल्या नीरा ग्रामपंचायतीने दीपावलीनिमित्त कर्मचार्‍यांना दोन महिन्यांंच्या वेतना इतका बोनस म्हणून दिल्याने ग्रामपंंचायत कर्मचार्‍यांची दिवाळी गोड झाल्यानेे कर्मचार्‍यांनी आनंद व्यक्त केला आहे.

कोरोना संकटाच्या काळात नीरा ग्रामपंंचायतीच्या कर्मचार्‍यांनी उत्कृष्ट काम करून नीरेकरांना चांगली सेवा दिली आहे. याबद्दल कर्मचा-यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मानही करण्यात आला आहे. आत्ता दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नीरा ग्रामपंचायतीच्या ४२ कर्मचार्‍यांना दोन महिन्यांच्या वेतना इतका बोनस व एक महिन्यांंचे वेतन अदा करून ग्रामपंंचायत कर्मचा-यांची दिवाळी गोड करण्यात आल्याची माहिती नीरा ग्रामपंंचायतीचे प्रशासक नामदेव गायकवाड व ग्रामसेवक मनोज ढेरे यांनी दिली.

दरम्यान, ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना बोनस देऊन दिवाळी गोड केल्याबद्दल ज्येष्ठ लिपिक सचिन ठोंबरे, गणीभाई सय्यद, पाणी पुरवठा विभाग प्रमुख रामभाऊ ताकवले यांनी आनंद व्यक्त करून प्रशासक व ग्रामसेवक यांचे आभार मानले.