हैदराबाद रेप केस : ज्या ठिकाणी ‘गुन्हा’, त्याच ठिकाणी ‘एन्काऊंटर’ !

हैदराबाद : पोलीसनामा ऑनलाइन – दहा दिवसापूर्वी ज्या ठिकाणी त्यांनी बलात्कार करुन महिला डॉक्टरांला पेटवून देऊन जिवंत जाळले होते. त्याच वेळेला, त्याच ठिकाणी या चारही आरोपींचा एन्काऊंटर करण्यात आले. पोलिसांच्या या कृत्याचे अनेकांनी समर्थन केले आहे.

देशात या एन्काऊंटरचे स्वागत होत आहे.
ही घटना २८ नोव्हेंबर रोजी घडली होती. सायबराबाद येथील टोलप्लाझाच्या जवळ एका महिलेचा जाळलेला मृतदेह मिळाला होता. तो डॉक्टर महिलेचा होता. मोहम्मद पाशा, नवीन, चिंताकुंता केशावुलु और शिवा अशी त्यांची नावे आहेत. या चौघांनाही पकडण्यात पोलिसांना यश मिळाले होते. न्यायालयाने त्यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. त्याची मुदत दोन दिवस राहिले होते. शहरात बाहेर या घटनेचा खूप रोष होता. त्यामुळे पुरावा गोळा करण्यासाठी पोलीस या आरोपींना दिवसा घटनास्थळावर घेऊन जाऊ शकत नव्हते.

त्यामुळे आरोपींनी हा प्रकार नेमका कसा केला, हे समजावून घेण्यासाठी जेव्हा ही घटना घडली होती. त्याचवेळी त्यांना तेथे पोलीस आरोपींना घेऊन गेले. त्यांनी या महिला डॉक्टरची गाडी कशी पंक्चर केली. त्यानंतर तिला मदत करण्याच्या बहाण्याने ते कसे तिला बाजूला घेऊन गेले व कोठे बलात्कार केला. त्यानंतर महामार्गावरील पुलाखाली तिला कशा प्रकारे पेटवून देऊन जाळले, हे पोलीस समजावून घेत होते. पहाटे तीन वाजता आरोपींपैकी एकाने पोलिसांच्या कडील पिस्तुल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार करुन त्यांचा एन्काऊंटर केला.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like