बॉलिवूडमधील ‘अवॉर्ड’बद्दल सोनाक्षी सिन्हाचा मोठा ‘खुलासा’, ‘या’ कलाकारांना सुनावलं ‘खरंखोटं’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार सोनाक्षी सिन्हा हिनं एका मुलाखतीत आपल्या करिअरमधील अनेक मोठ्या गोष्टींचा खुलासा केला आहे. आपल्या करिअरमधील चढउतार सांगताना तिनं अवॉर्डवरून बॉलिवूडला चपराक लगावली आहे. सोनाक्षी अशी पहिली अभिनेत्री आहे जिनं गेल्या 10 वर्षात बॉक्स ऑफिसवर 1500 कोटींची कमाई केली आहे. तिनं अद्याप कोणाकडेही काम मागितलं नसून तिच्या नावावर हा एक मोठा रेकॉर्ड आहे असं तिनं म्हटलं आहे.

View this post on Instagram

🍂

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona) on

एका मुलाखतीत बोलताना आपली नाराजी व्यक्त करताना सोनाक्षी म्हणाली, “ज्या पद्धतीनं मला सिनेमांसाठी सन्मान मिळायला हवा होता त्या पद्धतीनं मिळाला नाही. दबंग सिनेमा सोडला तर चाहत्यांनी माझ्या कोणत्याही सिनेमाला पसंती दिली नाही. आमिर खान आणि कंगनासारख्या कलाकारांनी सिद्ध केलं आहे की, बॉलिवूडमध्ये चांगलं काम करणाऱ्यांना कधीच अवॉर्ड मिळत नाही. लोक प्रेम देतात यातच मी खुश आहे. एखाद्याचा मित्र आहे म्हणून जर मला अवॉर्ड मिळत असेल तर असा अवॉर्ड मला अजिबात नको.” असं म्हणत तिनं इतर कलाकारांना चांगलेच खडेबोल सुनावले.

सोनाक्षी म्हणते, “बॉलिवूडमध्ये अनेक लोक येतात, मित्र बनतात आणि नंतर निघून जातात. मी या क्षेत्रात काम करताना कोणाचा चमचा बनून काम करणार नाही.” असं म्हणत तिनं आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली.

सोनीक्षीला लुटेरा सिनेमासाठी 2014 मध्ये बेस्ट अ‍ॅक्ट्रेससाठी नॉमिनेशन देण्यात आलं होतं. दबंग सिनेमासाठी तिला फिल्मफेअर अवॉर्डही देण्यात आला होता. परंतु गेल्या 6 वर्षात मात्र सोनाक्षीला कोणताही अवॉर्ड मिळालेला नाही. यावरून बोलताना तिनं मोठा खुलासा केला. ती म्हणाली, “जेव्हा मी विचारलं तुम्ही ज्याला आधी पॉप्युलर चॉईस अवॉर्ड मिळाला त्या व्यक्तीला अवॉर्ड कसाकाय देता. तेव्हा मला धक्कादायक उत्तर मिळालं. ज्याला हा अवॉर्ड मिळाला त्याला बॉक्स ऑफिसवर जास्त चांगली कामगिरी केल्याचं म्हटलं जातं.” असं तिनं सांगितलं.

हे. याविषयी बोलताना सोनाक्षीनं मोठा खुलासा केला आहे. ‘जेव्हा मी विचारलं, तुम्ही ज्याला याआधी पॉपुलर चॉईस अवॉर्ड मिळालेल्या व्यक्तीला अवॉर्ड कसं काय दिलं आहे. त्यावर धक्कादायक उत्तर आलं आहे, ज्याला हा अवॉर्ड मिळाला त्याला बॉक्स ऑफिसवर जास्त चांगली कामगिरी केल्याचं म्हटलं.’ हे उत्तर अजब असल्याचं सोनाक्षीने म्हटलं आहे.

 

You might also like