नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून (EPFO) त्यांच्या सहा कोटी खातेधारकांना एक अलर्ट जारी केला आहे. ईपीएफओच्या (EPFO) सूचनांकडे दुर्लक्ष केले तर आपल्या पीएफच्या पैशाला धोका आहे. कंपनीने ट्विटरद्वारे हा अलर्ट जारी केला असून तुमचा UAN, PAN Card, Aadhaar Card क्रमांक कोणत्याही व्यक्तीला शेअर करू नका असा अलर्ट देत बनावट कॉल्सपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
ईपीएफओने (EPFO) ट्विटमध्ये एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहा. ईपीएफओ कधीच फोन, सोशल मीडिया, व्हॉटस अॅपच्या माध्यमातून युएएन नंबर, आधार क्रमांक, पॅन नंबर, बँक तपशील ओटीपी यासारखे नंबर्स विचारत नाही. त्याचबरोबर कोणत्याही सेवेसाठी ईपीएफओ (EPFO) सोशल मीडिया, व्हॉटस अॅपच्या माध्यमातून पैसे डिपॉझिट करण्यास सांगत नाही. त्यामुळे खातेधारकांनी ईपीएफओच्या नावाने येणाऱ्या अशा बनावट कॉल्सपासून सावध रहावे. याशिवाय फेक वेबसाईट टाळण्याबरोबरच कोणत्याही माहित नसणाऱ्या सोअर्सवरून कोणतही अँप डाऊनलोड करणंही धोकादायक असल्याचे म्हंटले आहे. या अलर्टकडे दुर्लक्ष केले तर फसवणूक होऊन मोठे नुकसान होऊ शकते.
#EPFO never asks its members to share their personal details like Aadhaar, PAN, UAN, Bank Account or OTP over phone or on social media.#SocialSecurity #ईपीएफ@byadavbjp @Rameswar_Teli @PMOIndia @PIB_India @PIBHindi @MIB_India @DDNewslive @airnewsalerts @mygovindia @PTI_News pic.twitter.com/kG6UQ5O3mb
— EPFO (@socialepfo) October 23, 2021
बँकाही वेळोवेळी अलर्ट जारी करतात
ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी विविध बँका देखील दररोज अलर्ट जारी करत असतात. एमएमएसद्वारे,कॉल्स तसेच ट्विटर हँडलवरून बँक आपल्या ग्राहकांना अलर्ट पाठवत असते. बँकाही अशा बनावट कॉल्स, एसएमएस, मेल्सपासून सावध राहण्याचा सल्ला देतात.
Narayan Rane | ‘…नाहीतर लोक बाजूच्या मंत्रालयात जातील आणि ते तर सध्या बंद आहे’
Chandrakant Patil | भाजपला हरवणे सोपे नाही, BJP चा राष्ट्रवादीला इशारा