निजामाच्या ८ कोटींचा ‘वारसदार’ भारत की पाकिस्तान ; इंग्लंडच्या न्यायालयात पुढील महिन्यात ‘फैसला’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि पाकिस्तान यांच्या फाळणीला ७५ वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला असला तरी अजूनपर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध सुधारलेले नाहीत. दोन्ही देशांना फाळणी करताना सगळे काही वाटून मिळाले आहे. मात्र एका गोष्टीसाठी या दोन देशांमध्ये मागील ७० वर्षांपासून लढाई सुरु असून भारत-पाकिस्तान यांच्यात ३५ मिलियन पौंड अर्थात ८ कोटींसाठी गेल्या अनेक दशकापासून लढाई सुरु आहे. इंग्लंडच्या एका न्यायालयात या ८ कोटींसाठी सुनावणी सुरु आहे. पुढील ६ आठवड्यात यासंदर्भातील निर्णय होण्याची शक्यता आहे.त्यामुळे या आठ कोटींचा वारसदार कोण याकडे दोन्ही देशातील जनतेचे लक्ष लागले आहे.

काय आहे वाद
भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील या वादाचा मुद्दा आहे हैदराबादच्या निजामाचा पैसा. यासाठी भारत आणि पाकिस्तान मागील क्रित्येक दशके कायदेशीर लढाई लढत आहे. 1948 साली लंडनच्या नेटवेस्ट बँकेत १०,०७,९४० पौड (जवळ जवळ ८ कोटी ८७ लाख रुपये) पाठवले होते. मात्र त्यानंतर ही रक्कम वाढत जाऊन जवळपास आता ती तीन अब्ज रुपयांवर पोहोचली आहे. भारत आणि पाकिस्तान स्वतंत्र झाल्यानंतर त्याचा ओढा पाकिस्तानकडे जास्त होता. त्यामुळे पाकिस्तानकडे पैशांची कमतरता असल्याचे त्याला भरपूर जणांकडून कळत होते. त्यामुळे त्याने पाकिस्तानचे इंग्लंडमधील उच्चायुक्त हबीब इब्राहिम रहीमटोला यांच्या लंडनमधील बँकेत पैसे पाठवले. मात्र भारतातील निजामाच्या वंशजांनी त्याविरोधात दावा दाखल करत हे बेकायदेशीर असल्याचे म्हटले. दावा करणारे सर्व वंशज भारतीय समर्थक होते.

त्यानंतर न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरु झाली. यामध्ये पाकिस्तानी उच्चायुक्त विरुद्ध सात जण असा हा खटला होता. यामध्ये भारत सरकार भारताचे राष्ट्रपती आणि निजामाचे वंशज यांचा समावेश आहे. खूप वर्षांपासून चालत आलेला हा खटला निर्णायक स्थितीत पोहोचला असून भारताच्या निकाल लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या खटल्याविषयी बोलताना निजामाचे वकील पॉल हेव्हिट म्हणाले कि, यासंदर्भातला निर्णय लवकरच होऊ शकतो. या खटल्यात आठवे निजाम युवराज मुकर्रम जेह आणि त्यांचे छोटे भाऊ मुफाखाम जेह भारताच्या बाजूने आहेत. त्यामुळे हे पैसे भारतालाच मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

आरोग्य विषयक वृत्त

संधिवाताच्या रुग्णांना कोणते खाद्यपदार्थ ठरू शकतात फायदेशिर, जाणून घ्या

समस्या चुटकीसरशी घालवणाऱ्या घरगुती उपायांमागील विज्ञानही माहिती हवे

आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर घरच्याघरी होऊ शकतात उपाय

हेअर ड्रायरचा अतीवापर ‘केसां’साठी धोकादायक