सही करत असताना तुम्ही लिहीत असणाऱ्या, वापरणाऱ्या प्रत्येक शब्दांचा एक वेगळा अर्थ असतो, जाणून घ्या तज्ञ डॉ. नवनीत मानधनी काय सांगतात

आपण म्हणजे जी लोक साधारणतः आता ज्यांचे वय (35) पस्तीसच्या पुढे आहे, अशी आपण 8वी, 9वी 10वी त आल्यानंतर आपण सही केली, आताची पिढी आणखी लवकर करतात,परंतु सहसा आपल्या सहीमधून आपले आई, वडील, आपले आजी, आजोबा, सासू पण दिसतात.

साधारणपणे मनुष्याचा जन्म झाल्यानंतर तो 0-7वर्ष वयापर्यंत आई शशी म्हणजेच जिने जन्म दिलाय किंवा जी त्याचा पालन पोषण करत असते तीच्याशी खूप जास्त जवळ असतो ,
आणि 7-14 तो त्याच्या वडिलांशी खूप जवळ असतो, ह्या 14 वर्षांत त्याचा अवचेतन मन (subconscious mind) जे जे काही बघतो ते ते त्याच्या अवचेतन मनात जपल्या जात (saves in subconscious mind) आणि तेच त्याच्या हस्ताक्षरात आणि सहीमध्ये येत असते.

आपण सहीमध्ये साधारणपणे काय लिहितो
– काही लोक फक्त आपलं नाव/
– काही लोक आपलं नाव आणि आडनाव/
-आणि काही लोक आपलं नाव , वडिलांच नाव आणि आडनाव/
– किंवा काही लोक नावाचा आणि वडिलांच्या नावाचं प्रारंभिक (Initials) आणि आडनाव…

मग तुम्ही लिहीत असणाऱ्या या प्रत्येक शब्दाचा फार मोठा अर्थ लपलेला आहे. आपण एक एक करून ह्या प्रत्येकाचा महत्व जाणून घेण्याचा प्रयत्न करूया…

आजचा जो आपला त्या सही मधला जो पहिला भाग आहे जी लोक आपल्या सहीमध्ये फक्त स्वतः च नाव लिहितात त्याचा काय अर्थ असतो :- अशी लोक फक्त स्वतःचं नाव लिहीत असतील आणि ते नाव जर ठळकपणे वाचता येऊ शकत असेल तर अशी लोक खूप जास्त तडकाफडकी निर्णय घेतात, लोकांच्या तोंडावर बोलतात, कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत त्यांना बेशिस्तपणा चालत नाही. कधी कधी थोड्या प्रमाणात ते स्वतः साठी स्वार्थीपण होतात.

माझ्या बघण्यात बऱ्याचशा वेळेस अस आलेलं आहे, लग्नानंतरच्या counselling करताना आजकालची मुलं मुली जर सही करताना फक्त मुलाची सहीमध्ये जर तो फक्त स्वतः च नाव लिहीत असेल आणि मुलगी पण फक्त स्वतः चा नाव लिहीत असेल तर ह्यांचे फार खटके उडतात, असंच parternship भागीदारी च्या व्यवसायमध्ये पण बघता येईल किंवा एखाद्या व्यवसायामध्ये मालक आणि त्याचा खास मॅनेजर ह्यांच्या दोघांच्या सह्या जर अशा असतील तर अशा ठिकाणी खूप जास्त मतभेद (disputes) होऊ शकतात.

साधारणपणे अशी फक्त स्वतः चे नाव लिहून सही करणारे लोक अत्यंत शिस्तप्रिय असतात south indian लोक सहसा अशी सही करतात आणि अशी लोक साधारणपणे बॅंकेत वगैरे मॅनेजर पदावर दिसतात.

तुम्हाला जर administrative level वरती एखादा उत्तम व्यक्ती हवा असेल तर नक्की या सहीचा बघा
पण दैनंदिन जीवनात अशी सही फार चांगली समजली जाते नाही  तर आपण ह्याच्या पुढ्च्या लेखात बघुयात जी लोक सहीत आपला नाव आणि आडनाव आणि आपलं नाव वडीलांचं नाव आणि आडनाव लिहिणाऱ्या व्यक्तींचा काय अर्थ असतो.

अधिक माहितीसाठी – डॉ. नवनीत मानधनी (86051 12233)

क्रमशः….