प्रत्येकाच्या घरी ‘गोमाता’ असावी, जाणून घ्या ‘महत्व’

पोलीसनामा ऑनलाइन – हिंदू धर्म शास्त्रानुसार गाईला अत्यंत पवित्र आणि पूजनिय मानले गेले आहे. सर्व पौराणिक शास्त्र परंपरेत वेद – पुराण – उपनिषदांमध्ये तसेच इतर अनेक धर्मग्रंथांमध्ये गोमातेचे व तिच्या पूजनाचे वर्णन व महत्व पदोपदी केलेले आपल्याला आढळून येते.

मुळातच गाईला “कामधेनू” ची उपमा दिलेली आहे. देव – दानवांच्या समुद्र-मंथनातून प्रगट झालेल्या चौदा रत्नांमध्ये कामधेनूचा उल्लेख आलेला आहे. स्वर्गलोकी वास्तव्य असलेल्या कामधेनूला अर्थातच गोमातेला जनकल्याणासाठी “कपिल मुनिंनी” भूलोकात आणल्याचे उल्लेख अनेक पुराणांमध्ये सुद्धा नमूद केलेला आहे.

कामधेनू अर्थात गोमाता ही सर्व मनुष्य – प्राण्यांसाठी एक वरदानच आहे. अनेक ठिकाणी आपण वाचले असेल, ऐकले आहे की गोमातेचे अर्थात प्रत्यक्ष गोसेवा केल्याने अनंत पुण्य प्राप्त होते. गाईच्या चरणांची केवळ धूळ मस्तकी धारण केल्यानेच तीर्थस्थानाचे पुण्य मिळते असे वर्णन अनेक ग्रंथात आहे.

दुर्दैव आहे की आजकाल गोहत्याच्या बातम्या आपल्या कानावर येतात. याला आळा घालण्यासाठी अनेकजण उपाय देखील करत असतात. आपणही गोसेवा केली पाहिजे. रस्त्याने जाणाऱ्या गाईचे दुरून किंवा स्पर्श करून दर्शन घेतल्याने गो सेवा होणार नाही. गोसेवा करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरी गाय आणून तिची सेवा केली पाहिजे. गाईपासून मिळणाऱ्या दुधात, गोमूत्रात खूप शक्ती असते. गोमातेचा सहवास देखील मनुष्याला अनेक रोगांपासून दूर ठेवतो.

– गो सेवक

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/