Exit Poll Results 2023 | भाजपला मध्यप्रदेशात धक्का! काँग्रेस बाजी मारणार, एक्झिट पोलचे निकाल आले

नवी दिल्ली : Exit Poll Results 2023 | मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या ३ डिसेंबर रोजी सर्व राज्यातील मतमोजणी होणार आहे. आज तेलंगणात विधानसभेच्या ११९ जागांसाठी मतदान झाल्यानंतर एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत. (Exit Poll Results 2023)

मध्य प्रदेश Exit Poll Results 2023

एक्झिट पोलनुसार, मध्य प्रदेशात काँग्रेस बाजी मारणार आहे. येथे काँग्रेसला येथे १११-१२१, तर भाजपला १०६-११६ जागा मिळतील. येथे बहुमताचा आकडा ११६ आहे.

छत्तीसगड

छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या ९० जागा असून येथे काँग्रेसला ४०-५० जागा मिळू शकतात. तर भाजपला ३६ ते ४६ जागा मिळतील. येथे बहुमताचा आकडा ४६ आहे.

मध्य प्रदेशात विधानसभेच्या एकूण २३० जागा असून २०१८ च्या निवडणुकीत भाजपला १०९, काँग्रेसला ११४, बसपाला २ आणि इतरांना ७ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसचे काही आमदार फुटल्याने काँग्रेसची सत्ता कोसळून भाजपची सत्ता आली होती.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Narayan Rane | राणे पत्रकारांवरच भडकले, कोण आहे जरांगे पाटील? मी ओळखत नाही, कशाला सतत नाव घेता…

Chandrashekhar Bawankule | चंद्रशेखर बावनकुळेंची विरोधकांवर टीका, देवेंद्र फडणवीस हेच मराठा आरक्षणाचे जनक

Praful Patel | शरद पवार-अजित पवार एकत्र येणार? प्रफुल्ल पटेल स्पष्टच म्हणाले – ”घड्याळ तेच वेळ नवी…”

Pune Pimpri Crime News | बँक खाते हॅक करून महिलेला लाखोंचा गंडा, वाकड परिसरातील घटना

Pune Crime News | आत्महत्या करण्यापुर्वी बनवला व्हिडीओ अन् इमारतीच्या 6 व्या मजल्यावरुन उडी मारून तरुणाची आत्महत्या, कोंढवा परिसरातील घटना