फेसबुक बातम्यांसाठी वेगळं सेक्शन लाँच करणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फेसबुक आपल्या युजर्ससाठी एक नवीन न्यूज सेक्शन लाँच करणार आहे. या न्यूज सेक्शनच्या माध्यमातून जगभरातील सर्व बातम्या या युजर्सना पाहायला मिळणार आहेत.

काही दिवसांपूर्वी फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी फेसबुकमध्ये लवकरच एक न्यूज टॅबचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. फेसबुकने आपल्या प्लॅटफॉर्मवरून न्यूज सेक्शन सुरू करण्यासाठी न्यूयॉर्क पोस्ट, वॉशिंग्टन पोस्ट, समाचार कॉर्प मीडिया हाऊस यांसारख्या प्रमुख मीडिया हाऊसशी चर्चा सुरू केली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार युजर्सना आता फेसबुकवर नवीन न्यूज सेक्शन मिळणार आहे.

फेसबुक आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स ॲड करत आहे. यापूर्वी फेसबुकचा वापर चॅटींग आणि पोस्ट टाकण्यासाठी होत होता. त्यानंतर आता फेसबुकने आपली व्याप्ती वाढवण्यास सुरुवात केली आहे.

Visit : Policenama.com