Fake Currency | कोल्हापूरमध्ये 200 नोटेपासून बनवल्या 2000 च्या हुबेहुब नोटा, पण…

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – दोनशे रुपयांच्या नोटेपासून दोन हजार रुपयांची हुबेहुब बनावट नोटा (Fake Currency) बनवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बनावट नोटा (Fake Currency) प्रकरणात कोल्हापूरमध्ये (kolhapur) दोघांना अटक (arrest) करण्यात आली आहे. मागील अनेक महिन्यापासून प्रयोग करुन दोनशेच्या नोटेपासून दोन हजाराची हुबेहुब नोट करण्यात आली होती. ही नोट एका राष्ट्रीयकृत बँकेत (Nationalized Bank) भरण्याचा प्रयत्न केला असताना आरोपींचे बिंग फुटलं. बनावट नोटांचा सिरीअल क्रमांक (Serial number) एकच असल्याने आरोपीचं गुपित समोर आलं आहे.

उत्तम पोवार (रा. पालकरवाडी ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) त्याचा मित्र अनिकेत असं अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. उत्तम पोवार याने बनावट नोटा तयार केल्या होत्या. आरोपीचे शिक्षण 12 वीपर्यंत शिक्षण झालं आहे. पण आरोपीनं सर्च चॅनेलवरून (search channel) प्रशिक्षण घेतलं. त्याने दोनशे रुपयांच्या खऱ्या नोटेपासून दोन हजार रुपयांची बनावट नोट तयार करण्याचं कौशल्य आत्मसात केलं.

आरोपीचा हा उद्योग मागील महिन्यापासून सुरु होता. आरोपी पोवारने आपल्या घराच्या पोटमाळ्यावर संगणक आणि प्रिंटरद्वारे असे प्रयोग करत होता. बऱ्याच प्रयत्नानंतर तो या प्रयोगात यशस्वी झाला होता. यासाठी त्यानं दोन हजार रुपयांच्या 17 नोटा तयार केल्या होत्या. त्यानंतर आरोपीनं आपल्या एका मित्राकडे हे पैसे बँकेत जमा करण्यासाठी दिले. संबंधित मित्राच्या वडिलांचा जेसीबीचा व्यवसाय होता. त्यामुळे तो नेहमी बँकेत पैशांचा भरण्यासाठी जात होता, हे आरोपीला माहित होते.

याच संधीचा फायदा आरोपीने घेतला आणि मित्राकडे 2000 रुपयांच्या 17 बनावट नोटा बँकेत भरणा करण्यासाठी दिल्या.
मित्राने 1 लाख रुपयांच्या खऱ्या आणि 34 हजार रुपयांच्या खोट्या नोटा राष्ट्रीयकृत बँकेत जमा केल्या.
बँकेतील कर्मचाऱ्याला देखील सुरुवातीला खोट्या नोटा ओळखता आल्या नाहीत.
मात्र या नोटा एकाच क्रमांकाच्या असल्याचे त्याच्या लक्षात आले आणि आरोपीचे बिंग फुटले.
केवळ सिरीअल क्रमांक एकच असल्याने आरोपीचं बिंग फुटलं.
बँक कर्मचाऱ्याने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी (Police) दोन्ही आरोपींना अटक केली.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title :- Fake Currency | man made fake rs 2000 worth currency note from 200rs real note in kolhapur 2 arrest

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aadhar Card Verify | फसवणूक टाळण्यासाठी ड्रायव्हर, नोकर, भाडेकरूचं आधार कार्ड Verify कसं कराल? जाणून घ्या एकदम सोपी प्रक्रिया

Aadhar Card Verify | फसवणूक टाळण्यासाठी ड्रायव्हर, नोकर, भाडेकरूचं आधार कार्ड Verify कसं कराल? जाणून घ्या एकदम सोपी प्रक्रिया

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 161 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी