प्रसिध्द कास्टिंग डायरेक्टर सेहर लतीफ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइऩ – बॉलिवूड अन् हॉलिवूडच्या प्रसिध्द कास्टिंग डायरेक्टर सेहर लतीफ sehar latif यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. लतीफ sehar latif यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या.

त्यांना उपचारासाठी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारा दरम्यान प्रकृती दिवसेंदिवस बिघडत गेली अन अखेर त्याचा मृत्यू झाला.

अभिनेता प्रीत कमानी यांनी लतीफ यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

लतीफ यांच्या निधनाबद्दल बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे.

लंच बॉक्स, मान्सून शुटआऊट, शंकुतला देवी, दुर्गामती, मस्का आदी सारख्या चित्रपटांसाठी लतीफ यांनी कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम केले आहे.

तसेच भाग बिनी भाग नावाच्या वेब शोचही कास्टींग करत होत्या.

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला चित्रपट मस्का आणि भाग बिनी भाग हा वेब शो आपल प्रोडक्शन हाऊस म्युटंट फिल्म्स अंतर्गत प्रोड्यूस केले होते.

हॉलिवूडमध्ये देखील ईट लव्ह प्रे, फ्युरिअस 7, टाईगर्स, वॉईसराईज हाऊस, मॅक माफिया, सेंस 8 आदी चित्रपटांचे त्यांनी कास्टींग केले आहे.

 

Also Read This : 

 

नोकरदारांसाठी मोठी बातमी ! लवकरच पगारातील PF कपात वाढणार, जाणून घ्या काय आहे सरकारचा प्लॅन

 

शरीरातील ऑक्सिजन लेव्हल संतुलित ठेवण्यासाठी आहारामध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश; निश्चित होईल फायदा, जाणून घ्या

 

8 जून राशीफळ : ‘या’ 4 राशींनी राहावे सावध, धनहानीचे संकेत, इतरांसाठी असा आहे मंगळवार

 

शॉम्पू केल्याच्या दुसर्‍याच दिवशी केस तेलकट होतात? ‘हे’ घरगुती उपाय येतील तुमच्या कामाला, जाणून घ्या

 

कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर सुद्धा अनेक लोकांमध्ये का दिसत नाही कोणतेही लक्षण? रिसर्चमध्ये समोर आली बाब

 

उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी दररोज ‘हे’ आसन करा !

 

नवाब मलिक यांचे भाजपला जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले – ‘जिथे भाजपा तिथेच मृतांचे आकडे लपवण्याचा खेळ सुरू’

 

पुस्तक वाचल्याने केवळ आपले ज्ञान वाढणार नाही तर आरोग्यासही होतील आश्चर्यकारक फायदे; जाणून घ्या