एका झटक्यात ‘मालामाल’ झाला शेतकरी, शेतात नांगरताना जमीनीत ‘खजिना’ सापडला

पोलीसनामा ऑनलाइन – आपण हॉलिवूड किंवा बॉलीवूड च्या सिनेमांमध्ये पाहिलं असेल की, जमिनीत खोदकाम करताना अचानक खजिना सापडला. तसेच खऱ्या आयुष्यामध्ये अशा प्रकारे जर एखाद्याला खजिना सापडला तर काय होईल, अशा प्रकारच्या बातम्या अनेकवेळा प्रसारित होत असतात. पण तेलंगणामधील संगारेड्डी जिल्ह्यातील जहीराबाद येथे एका शेतकऱ्याला शेत नांगरताना सोने आणि बरीच रत्ने तसेच अनेक कलाकृती सापडल्या आहेत. काही जणांना ही गोष्ट फिल्मी वाटेल पण खरी आहे.

येरगडापल्ली गावाचा असलेला याकूब अली पिकाच्या पेरणीसाठी शेतामध्ये नांगरणी करत होता. नांगरणी करीत असताना याकूबच्या नांगरात काहीतरी अडकले. मग त्याने ते काय आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला. जेव्हा याकूब अलीने नीट पहिले, तेव्हा त्यास धक्का बसला. सुरुवातीस त्याला पितळेची तीन भांडी मिळाली. ज्यात दागिने सोने, चांदी आणि तांब्याचे दागिने भरले होते. नंतर अनेक गोष्टी त्या भांड्यामध्ये सापडल्या. याबाबत याकूबने लगेच पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर स्थानिक पोलिस आणि महसूल अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. गावातील ग्रामस्थांना याची माहिती मिळताच, त्यांनी हे खरं आहे की खोटं हे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्ह्यातून जहीराबाद साठी रोड जातो. औरंगाबाद निजामांची पहिली राजधानी असायची. जगातील सर्वात श्रीमंत निजाम येथे राहत होते. कोहिनूर हिऱ्याची उत्पत्ती गोल कोंडा येथील खाणीमधून झाली होती. शेतकऱ्याला जमिनी तून मिळालेल्या या वस्तू निजाम काळातील असण्याची दाट शक्यता असल्याचं सांगितलं जात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत उत्खलनातून २५ सोन्याची नाणी, गळ्यातील दागिने, अंगठ्या, पारंपरिक भांडी सापडली आहे. जे पुरातत्व विभागाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. हे दागिने, सोन्याची नाणी, धातूची भांडी कोणत्या युगातील आहेत हे जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ प्रयत्न करीत आहेत. त्यानंतरच योग्य ती माहिती मिळेल.