आज मध्यरात्रीपासून लागू होणार Fastag, 16 डिसेंबरपासून NEFT ची सुविधा 24 तास, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन : येत्या १५ आणि १६ डिसेंबरपासून बँकिंग, रस्ते वाहतूक आणि दूरसंचार क्षेत्रातील ग्राहकांशी संबंधित अनेक नवीन बदल अंमलात येणार आहेत. जर आपण राष्ट्रीय महामार्गांचा वापर करत असाल तर, १४ डिसेंबर रोजी मध्यरात्री म्हणजेच रात्री १२ नंतर फास्टॅगची यंत्रणा कार्यान्वित होईल. तर सोमवारपासून ट्राईचे नियम अंमलात येतील, ज्यामध्ये तीन दिवसांत नंबर पोर्ट केला जाईल. १६ डिसेंबरपासुन NEFTची सुविधा २४ तास उपलब्ध होईल.

अंतिम मुदत न वाढविल्यास फास्टॅग १५ डिसेंबरला सर्व राष्ट्रीय महामार्गांच्या टोल नाक्यावर लागू होईल. याशिवाय, आपण फास्टॅग लेनमध्ये वाहन नेल्यास दुहेरी टोल आकारला जाईल. महामार्गावर आता हायब्रीड लेन असेल, जेथे फास्टॅग नसलेल्या वाहनांकडून टोल घेतले जातील.

आयसीआयसीआय बँक १५ डिसेंबरपासून ग्राहकांना केवळ रोख व्यवहार ऑफर करेल. यानंतर, व्यवहारावर १५० रुपये शुल्क आकारले जाईल. होम ब्रांचमध्ये मोफत ठेव घेण्यासाठी जास्तीत जास्त दोन लाख रुपयांची मर्यादा देखील असेल. यानंतर प्रती हजार रुपयावर ५ रुपये फी आकारेल. ज्यात किमान शुल्कही १५० रुपये असेल.

१६ डिसेंबरपासून नवीन नियमांनंतर ग्राहक तीन कामकाजाच्या दिवसात त्यांचे नंबर पोर्ट करण्यात सक्षम होतील. दुसर्‍या सर्कलमध्ये नंबर पोर्ट करण्यासाठी पाच दिवस लागतील. सध्या यासाठी १५ ते २० दिवस लागतात. दरम्यान, पोर्टिंग कोड विशिष्ट अटींवर मिळणार आहे. ज्यात ग्राहकाचे कमीतकमी ९० दिवसांसाठी कंपनीचे सक्रिय कनेक्शन असले पाहिजे. तसेच त्यांनी सर्व थकबाकी भरलेली हवी आहे.

सोमवारपासून बँका २४ तास NEFT करू शकतील, म्हणजेच कधीही पैसे ऑनलाइन पाठविण्याची किंवा घेण्याची सुविधा असेल. ही सुविधा १५ डिसेंबर रोजी रात्री १२:३० वाजता सुरू होईल. सध्या NEFT सर्व कामकाजाच्या दिवशी सकाळी ८ ते सायंकाळी ७ या वेळेत उपलब्ध असते. एनईएफटी-आरटीजीएसवरील शुल्क यापूर्वीच रद्द केले गेले आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/