चरबीयुक्त यकृत रोगांचे प्रमाण वाढतेय

पोलीसनामा ऑनलाइन – निष्क्रिय जीवनशैली व आहारातील साखरेचे वाढते प्रमाण यामुळे शहरी भागात चरबीयुक्त यकृत रोग वेगाने वाढत आहेत. काही वर्षांत या आजाराचे प्रमाण आणखी वाढू शकते. यकृताशी संबंधित आजाराने ग्रस्त अनेक रुग्ण दररोज डॉक्टरांकडे येत असतात. गेल्या २० वर्षांत ही संख्या पाच पटीने वाढली आहे. ब-याच प्रकरणांमध्ये प्रारंभिक अवस्थेत त्या रोगात कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने या आजाराचे लवकर निदान होत नाही.

एखाद्या व्यक्तीच्या यकृतामध्ये ५ टक्के चरबी असते. यकृताच्या मूळ वजनाच्या ५ ते १० टक्के वजनाचे यकृत असेल तर अशा चरबीयुक्त सामग्री असलेल्या व्यक्तींना सूजलेल्या यकृताच्या आजाराचा धोका अधिक असतो. या रोगामुळे यकृतामध्ये चरबी जास्त प्रमाणात जमा होते आणि अल्कोहोलमुळे आजारी पडण्याचा धोका वाढू शकतो. मधुमेह, लठ्ठपणा आणि चरबी यकृत रोगाचे प्राणघातक मिश्रण एखाद्या व्यक्तीच्या हृदयविकाराच्या झटक्याचे कारण बनवतो. पायांना सूज येणे, ओटीपोटात वेदना किंवा पोटदुखी, तसेच कमी भूक, वजन कमी होणे, शारीरिक कमजोरी आणि थकवा ही रोगाची काही लक्षणे आहेत.

या रोगाच्या प्रतिबंधक उपायांमध्ये ३०-४० मिनिटे एरोबिक व्यायामाचा समावेश करावा. योगा करणे देखील लाभदायक ठरते. शरीराचे वजन नियंत्रित करणे आणि हिरव्या भाज्या आणि फळे यासह जीवनशैली व्यवस्थापन महत्वाचे आहे. विटामिन ईचा वापर करुन मधुमेहावर अधिक चांगले नियंत्रण करता येते. यकृत अल्टासोनोग्राफी, कम्प्युटेड टोमोग्राफी स्कैन, मैग्नेटिक रेजोनेंस इमेजिंग व कंटोल्ड अटेनुएशन पैरामीटर यासारख्या निदान चाचण्यांद्वारे चरबी यकृत आजार ओळखता येतो.