पन्नास हजार रुपयांची फसवणूक

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – क्रेडीट कार्डचे रिवार्ड पॉईंटस रिडीम करण्याची बतावणी करुन कार्डची गोफणीय माहिती मिळवून त्याद्वारे ५० हजार रुपये ‘ट्रान्सफर’ करुन तरुणाची फसवणूक केली. ही घटना वाकड येथे घडली.

याप्रकरणी संजय शंकर पाटील (२९, रा. स्वामी विवेकानंदनगर, वाकड) याने फिर्याद दिली आहे. संजय पाटील यांच्याकडे एसबीआय बँकेचे क्रेडीट कार्ड आहे. रविवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर फोन आला. एसबीआय क्रेडीट कार्डचे रिवार्ड पॉईंटस रिडीम करण्याची बतावणी करुन पाटील यांच्याकडून कार्डची माहिती घेतली. त्या माहितीच्या आधारे पाटील यांच्या कार्डमधून ५० हजार रुपये ‘ट्रान्सफर’ करुन घेतले. वाकड पोलीस तपास करत आहेत.