महावितरण कर्मचार्‍यावर वार करणार्‍या दोघांना अटक

सांगली : पाेलीसनामा ऑनलाईन

महावितरण कंपनीचे कर्मचारी श्रेयस शहा यांच्यावर चाकूने वार केल्याप्रकरणी पोलिसांनी साहिल उर्फ जाफर मन्सूर मुल्ला (२३), अमोल कुमार कांबळे (३०), सुशांत कुमार आरगे (२२, रा. सर्व मकान गल्ली, खणभाग सांगली) या तिघांना अटक केली आहे.
[amazon_link asins=’B07417987C,B0785JJF7L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’92be8028-abad-11e8-a7f4-a16b4a6e9de0′]

घराचा खंडीत झालेला वीज पुरवठा ताबडतोब सुरू कर अशी बळजबरी करणार्‍या या तिघांनी सोमवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास शहा यांच्यावर कार्यालयातच चाकूहल्ला केला होता. शहा महावितरणच्या खणभागातील कार्यालयात विद्युत सहाय्यक म्हणून काम करतात. सोमवारी त्यांना कार्यालयातील तक्रार निवारण केंद्रातून अल्लाबक्ष मुल्ला यांच्या घरातील वीज पुरवठा खंडीत झाल्याची तक्रार करण्यात आली होती.

२ नागरिकांना लाच देताना पकडून देणाराच तलाठी एसीबीच्या जाळ्यात 

शहा हे मदतनीस प्रसाद व्हसवाडे याला घेऊन मुल्ला यांच्या घरी गेले. शहा यांनी तपासणी केली व पथदिवे सुरु झाल्याने घरातील बिघाड दुरुस्त करता येत नाही असे सांगितले व ते कार्यालयात परतले. त्यानंतर शहा यांना मुल्ला यांच्या घरासमोरील वीजेच्या खांबावर पेटले असल्याची तक्रार आली. त्यानंतर शहा पुन्हा इतर ७ ते ८ कर्मचार्‍यासह त्याठिकाणी गेले. यावेळी गणेश साळुंखे यांनी वीजेच्या खांबावरील वीज पुरवठा बंद केला.

पुण्यातील वरीष्ठ पोलीस निरीक्षकाच्या मुलाचा प्रवासादरम्यान मृत्यू

त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास शहा कार्यालयाकडे गेले. त्यानंतर संशयित साहिल मुल्ला हा तिघांना घेऊन कार्यालयात आला. साहिल मुल्ला याने घरातील वीज पुरवठा सुरू  करून दे असे म्हणत शहा यांच्यावर चाकूने वार केले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी