अखेर शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी रस्ता खोदणार्‍यावर FIR दाखल, पोलीसनामाचा दणका

शिक्रापुर / प्रतिनिधी (सचिन धुमाळ ) – शिरुर तालुक्यातील पीएमआरडीएच्या ताब्यात असलेल्या तळेगाव ढमढरे ते चाकण रोड करंदी फाटा या रस्त्याचे काही दिवसापुर्वीच सुमारे बारा कोटी रुपये खर्च करुन काम करण्यात आले होते. परंतु टेलिकॉम केबल वर्क्स या कंपनीची केबल गाडण्यासाठी चाकण रोड करंदीफाटा (फेबर कंपनी) ते तळेगाव ढमढेरे या रस्ताच्या साईड पट्टी व डांबरी रस्ता खोदल्याप्रकरणी पीएमआरडीए कडून एका कंञाटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पीएमआरडीए च्या वतीने भगवानदास रघुनाथ कुसाळे यांनी फिर्याद दिली असून राजू राठोड ( पुर्ण नाव माहीत नाही ) असे गुन्हा दाखल झालेल्या कंञाटदाराचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहीती अशी कि फिर्यादी भगवानदास कुसाळे हे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे शाखा अभियंता म्हणून काम करत आहे.शिरूर तालुक्यातील राज्य महामार्ग ५५ चाकणरोड (करंदी फाटा) ते तळेगाव ढमढेरे औद्योगिक क्षेत्रातील रस्ता इजिमा १५८ या रस्त्याचे काम सन २०१७ ते २०१९ यादरम्यान मेसर्स देवकर अर्थ मुव्हर्स खराडी पुणे यांच्या कडून करण्यात आले आहे.
कार्यकारी अभियंता भरतकुमार बाविस्कर यांच्या सुचनेवरून असे समजले कि शिरूर तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील रस्ता इजिमा१५८ सणसवाडी गावच्या हद्दीतील किमी 0/00 ते ९/00 चाकण रोड करंदी फाटा(फेबर कंपनी )ते तळेगाव ढमढेरे या रस्त्याच्या कडेची साईड पट्टी उकारून, डांबरी रस्ता खोदून टाटा टेलिकॉम केबल वर्क्स या कंपनीची केबल गाडण्याचे काम चालू आहे असे समजल्याने दि ५/७/२०२० रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मी मेसर्स देवकर अर्थ मुव्हर्सचे मालक तुकाराम किसन देवकर व गणेश तुकाराम डबडे( रा. आपले घर खराडी पुणे) आम्ही सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता तेथे रस्त्याची उजवीकडील बाजूस जेसीबी ने साईड पट्टी व डांबरी रस्ता खोदून केबल काढण्याचे काम चालू होते.

त्यावेळी सदर ठिकाणचे फोटो काढले व तेथील कामगारांना विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की सदरचे काम हे टाटा टेलिकॉम केबल वर्क्स कंपनीचे असून श्रीनिवास इंटरप्राईजेस भोसरी कॉन्ट्रॅक्टदार राजू राठोड यांचे सांगण्यावरून गेल्या पंधरा दिवसांपासून काम करीत आहोत असे कळविले. सदर रस्ता खोदण्याचे काम त्यांने विनापरवाना केलेले असून शासकीय रस्त्याचे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले आहे. तसेच सदर रस्ता खोदल्यामुळे रस्त्याने येणारे जाणारे लोकांचे जीवितास धोका निर्माण होऊ शकतो तसेच गंभीर अपघात होऊ शकतो तरी माझी कंञाटदार राजु राठोड यांच्याविरूद्ध सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद आहे असे तक्रारीत म्हंटले आहे.पुढील तपास शिक्रापुरचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापुर पोलिस करत आहेत.

या रस्ताचे खोदकाम झालेचे माहिती सेवा समितीचे चंद्रकांत वारघडे यांनी निदर्शनास आणून दिले होते व त्या बाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना पञ व्यवहार देखील केला होता.अखेरीस त्याच्या प्रयत्नाला यश आहे,तर या रस्ताचे खोदकाम झाल्याबाबत “पोलिसनामा “ने देखील वृत्त प्रकाशित होते.