‘डायपर रॅश’ म्हणजे काय ? काय आहेत याची ‘लक्षणं’ अन् ‘कारणं’ ? जाणून घ्या ‘उपाय’

पोलीसनामा ऑनलाइन टीम

डायपर रॅश म्हणजे काय ?

डायपर रॅशला डायपर डर्माटीटीस असंही म्हणतात. बाळाच्या पार्श्वभागाच्या त्वचेवर लाल चट्टे येणं म्हणजे डायपर रॅश. जगभरातील बाळांमध्ये याचं प्रमाण 7-35 टक्के आहे. जन्मानंतर एका आठवड्यात ही समस्या होऊ शकते. परंतु जास्त शक्यता ही 9-12 महिन्यात असते.

काय आहेत याची लक्षणं ?

-त्वचा लाल दिसणे
– मांड्या पार्श्वभाग कोमल वाटू शकतो.
– बाळाचं रडणं किंवा अस्वस्थ होणं
– डायपरची जागा धुताना बाळाची चिडचिड

काय आहेत याची कारणं ?

– डायपरचा योग्य वापर न करणं
– ओले डायपर जास्त वेळ वापरणं
– त्वचेवर डायपरचा जास्त स्पर्श होत राहणं
– संसर्ग
– अॅलर्जी

काय आहेत यावरील उपचार ?

– सौम्य स्टिरॉईडल क्रीमचा वापर
– अँटी फंगल क्रीम
– टॉपिकल अँटीबायोटीक्स

काळजी घेण्यासाठी काही टीप्स

-डायपरची जागा स्वच्छ, कोरडी ठेवावी आणि हळू साफ करावी.
– कपडे धुण्याची पावडर कपड्यांवर राहता कामा नये.
– डायपरच्या जागेला हवा लागवी यासाठी काही वेळ बाळाला बिना डायपरचं ठेवावं
– लाल चट्टे आले आहेत तिथं लोशन किंवा क्रीम लावावी
– बाळाला रोज कोमट पाण्यानं आणि सुगंधरहित साबणानं अंघोळ घालावी.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.