१ कोटी २० लाखांच्या ‘पीएफ’चा अपहार ; ‘या’ कंपनीच्या संचालकांवर गुन्हा

पुणे : पोलीसीनामा ऑनलाईन – कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कापण्यात आलेली भविष्य़ निर्वाह निधीची १ कोटी २० लाख रुपयांची रक्कम भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात जमा न करता तिचा अपहार केल्याप्रकऱणी सन-मून-कुरीयर्स प्रा. लि. या कंपनीच्या संचालकांवर अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आशिष यशवंत पाळंदे व यशवंत वासूदेव पाळंदे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संचालकांची नावे आहेत. याप्रकरणी अमरेशकुमार फुलेना सिंह (४२, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन-मून-कुरियर्स प्रा. लि. कंपनीचे कार्यालय एरंडवणे येथे कर्वे रस्त्यावर आहे. या कंपनीच्या आस्थापनेवरील संचालक आशिष पाळंदे आणि य़शवंत पाळंदे यांनी कर्मचाऱ्यांचा १ कोटी २० लाख ५०४ रुपयांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम खात्यात जमा केली नाही. ही रक्कम जमा न करता तिचा अपहार केल्याप्रकरणी तक्रार करण्यात आली आहे.