मतदान गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी धुळ्यात एकाविरुध्द FIR

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान प्रक्रिया गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी धुळे शहर पोलिस ठाण्यात हर्षल नावाच्या व्यक्तीविरुध्द भारतीय दंडविधान कलम 188, लोकप्रतिनिधी कायदा 1951 चे कलम 128 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यू सिटी हायस्कूलमधील मतदान केंद्रांवर हर्षल नावाच्या व्यक्तीने मतदान करताना ईव्हीएम मशीनसह काढलेला फोटो त्याच्या व्हॉटसॲप क्रमांकावर स्टेटसला ठेवल्याचे आढळून आले होते. याबाबत अपर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार भाया भीमसिंग पावरा यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल झाला. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बडगुजर अधिक तपास करीत आहेत.

Visit  :Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like