कॅलिफोर्नियातील धगधगत्या आगीचा व्हिडीओ, 8 जणांचा होरपळून मृत्यू

कॅलिफोर्निया : वृत्तसंस्था – बैरुद आणि जॉर्डननंतर आता कॅलिफोर्नियातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. तिथल्या जंगलाला लागलेल्या आगीने रौद्र रुप धारण केलं असून ही आग पश्चिमेच्या दिशेने सरकताना दिसत आहे. या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. जैवविविधतेने नटलेलं हे शहर आता भकास आणि राख होताना डोळ्यासमोर दिसत आहे. या आगीवर नियंत्रण मिळवणं कठीण असून ही आग अतिशय वेगाने पसरत असल्याची माहिती तिथल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली.

कॅलिफोर्नियाच्या जंगलात लागलेल्या भीषण आगीमध्ये आतापर्यंत 8 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून तब्बल 5 लाख लोक बेघर झाल्याची माहिती मिळत आहे. आगीचा सर्वाधिक फटका हा ओरेगनला बसला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दिवसेंदिवस ही आग अधिक रौद्र रुप धारण करत असल्याचे या व्हिडीओ मध्ये पहायला मिळत आहे. प्रशासन आणि अग्निशमन दलाकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हवेमुळे ही आग वेगाने पसरत असून ओरेगनमध्ये हजारो लोकांची घरं जळाली आहेत. जवळपास पाच लाखांहून अधिक लोक आगीमुळे बेघर झाली आहेत. या आगीमुळे आतापर्यंत सर्वाधिक नुकसान झालं आहे. जनजीवन विस्कळीत झालं आहे. लाखो लोकांना आपली घरं सोडून स्थलांतर केलं आहे. सॅन फ्रान्सिस्कोच्या ईशान्य पूर्वेतील प्लुमास नॅशनल फॉरेस्टमध्ये बुधवारी लागलेली ही आग एका दिवसात 40 किलोमीटरपर्यंत पसरली. काही तासांत 1036 चौरस किलोमीटर क्षेत्राची राख झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

ऑरेगनमध्ये ताशी 80 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात अपयश येत आहे. या वाऱ्याच्या वेगामुळे ही आग मोठ्या प्रमाणात पसरत आहे. ओरेगनच्या पश्चिमेला असलेल्या काही लोकवस्ती भागातील नागरिकांना घरे तातडीने खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.