मुंबईत 7 मजली इमारतीला भीषण आग, काहीजण आडकल्याची भीती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईतल्या सात मजली इमारतीला आग लागली आहे. या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान पोहचले असून आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरु आहे. या इमारतीतून धूर येऊ लागल्याने या इमारतीत आग लागल्याची माहिती समोर आली. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी दाखल झाले. काही लोक अडकले होते त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

मुंबईतील मस्जिद बंदर भागात असलेल्या इमारतीत आज (शुक्रवार) दुपारी दोनच्या सुमारास ही आग लागली. आता ही आग नियंत्रणात आणण्यात आली आहे. या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही, असं अग्निशमन दलाने स्पष्ट केलं आहे. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अवघ्या 26 मिनिटांनी त्यांनी आग नियंत्रणात आणली. ही आग कशामुळे लागली हे समजू शकलेले नाही.

दरम्यान, आग मोठी नसली तरी इमारतीतून लोकांना रेस्क्यू करण्यात येत आहे. स्थानिक पोलीस आणि अग्निशमन विभागाचे अधिकारी घटनास्थळी आहेत. अजूनही काही नागरिकांना बाहेर काढण्यात येत आहे. आगीचे कारण समजू शकले नसून पोलीस चौकशी करत असल्याचे सांगण्यात येत आहे.